1555192198 Master - rain in Maharashtra: प. महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पाऊस;
प्रचाराला फटका 
hits lok sabha elections campaign

rain in Maharashtra: प. महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पाऊस; प्रचाराला फटका hits lok sabha elections campaign

मराठी बातम्या


पिंपरी/रत्नागिरी

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात काही भागांमध्ये वीजेच्या
कडकडाटासह आज सायंकाळी पावसाच्या सरी बरसल्याने लोकसभा निवडणुकीच्या
प्रचारसभांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.

दरम्यान, रात्री मुंबईतही पावसाने हजेरी लावली. परळ, करीरोड,
चिंचपोकळी, ताडदेवसह काही भागांत तुरळक पाऊस पडला.

Master - rain in Maharashtra: प. महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पाऊस;
प्रचाराला फटका 
hits lok sabha elections campaign

पिंपरी-चिंचवडसह मावळ परिसरात शनिवारी संध्याकाळी वीजांच्या गडगटासह
पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दुपारपासून उकाड्याने हैराण
झालेल्या नागरिकांना अचाकन आलेल्या या पावसामुळे काही प्रमाणात
दिलासा मिळाला. वाकड भागात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याचे
नागरिकांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसापासून शहरात उकाडा जाणवत होता. शनिवारी सकाळपासून
या उकाड्यात अधिकच भर पडली होती. दुपारपर्यंत कडक ऊन पडलेले
असताना संध्याकाळी अचानक वातावरणात बदल झाला. आकाशात काळे ढग
दाटून आले. विजांचा कडकडाट सुरू होत सहाच्या सुमारास पाऊस पडण्यास
सुरुवात झाली. पिंपरी, चिंचवड, भोसरी परिसरात हलक्या स्वरूपाचा
पाऊस झाला तर आकुर्डी भागात पावसाची जोरदार सर येऊन गेली. अचानक
आलेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. तर काही नागरिकांची
मात्र चांगलीच तारांबळ उडाली. पादचाऱ्यांच्या, वाहनचालकांनी आडोसा
गाठला. वाकड परिसरात मात्र पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. काही
ठिकाणी गारा पडल्याचेही स्थानिक नागरिकांनी सांगितले. शनिवारी
दुपारनंतर आकाश ढगाळ राहणार असल्याची आणि महाराष्ट्रात काही
ठिकाणी पावसाच्या मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा
अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला होता.

Master - rain in Maharashtra: प. महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पाऊस;
प्रचाराला फटका 
hits lok sabha elections campaign

मावळ भागातही पावसाची हजेरी

मावळ परिसरातील अनेक भागात देखील दुपारी साडेतीनच्या सुमारास
अचानक पावसाने हजेरी लावली. उन्हात पाऊस पडत होता. वादळी वाऱ्यासह
आलेल्या पावसाबरोबरच विजांचा कडकडाट सुरु झाला. अचानकपणे आलेल्या
पावसामुळे जनावरांसाठी ठेवलेला चारा भिजला. आंबी, नवलाख उंब्रे,
टाकवे, वारंगवाडी, परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी
कोसळल्या. औद्योगिक वसाहतीमधील कंपनी सुटण्याच्या वेळेत पाऊस सुरु
झाल्यामुळे कामगार वर्गाची काही प्रमाणात धावपळ उडाली.

Master - rain in Maharashtra: प. महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पाऊस;
प्रचाराला फटका 
hits lok sabha elections campaign

राष्ट्रवादीची सभा थांबवली

मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ
पवार यांच्या प्रचारासाठी आज निगडी प्राधिकरणात छत्रपती खासदार
उदयनराजे महाराज यांची सभा अचानक आलेल्या पावसामुळे थांबवण्यात
आली.

Master - rain in Maharashtra: प. महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पाऊस;
प्रचाराला फटका 
hits lok sabha elections campaign

सातारा: जिल्ह्यात वाई आणि कोरेगाव परिसराला
गारपिटीचा तडाखा बसला.

Master - rain in Maharashtra: प. महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पाऊस;
प्रचाराला फटका 
hits lok sabha elections campaign

रत्नागिरीत बरसल्या गारा

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने
हजेरी लावली. संगमेश्वरमध्ये काही भागात गारा कोसळल्या. या
पावसामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती असून
आंबा बागायतदार धास्तावले आहेत. पावसामुळे आंबा फळ डागाळल्यास दर
घसरण्याची शक्यता आहे.

औरंगाबादमध्येही हजेरी

औरंगाबाद शहरात रात्री पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार
पाऊस तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. जय भवानी नगर परिसर,
मुकुंदवाडीतही पाऊस बरसला.

Master - rain in Maharashtra: प. महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पाऊस;
प्रचाराला फटका 
hits lok sabha elections campaignSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *