sitaram yechury: येचुरींनी ‘सीताराम’ हे नाव आधी बदलावे: शिवसेना he should change his first name ‘sitaram’: shiv sena Times

मराठी बातम्या


‘हिंदू हिंसक आहे. रामायण आणि महाभारत हे त्याचे पुरावे आहेत’, या
माकप नेते सीताराम येचुरी यांच्या विधानावरून वादाला तोंड फुटले
असून हिंदू हिंसक आहे म्हणणाऱ्या येचुरींनी त्यांचे ‘सीताराम’ हे
नाव तत्काळ बदलायला हवे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:May 3, 2019, 10:52PM IST


yechury raut - sitaram yechury: येचुरींनी 'सीताराम' हे नाव आधी बदलावे:
शिवसेना 
he should change his first name 'sitaram': shiv sena 
Times

येचुरींनी ‘सीताराम’ हे नाव आधी बदलावे: शिवसेना

नवी दिल्ली :

‘हिंदू हिंसक आहे. रामायण आणि महाभारत हे त्याचे पुरावे
आहेत’, या माकप नेते सीताराम येचुरी यांच्या विधानावरून
वादाला तोंड फुटले असून हिंदू हिंसक आहे म्हणणाऱ्या येचुरींनी
त्यांचे ‘सीताराम’ हे नाव तत्काळ बदलायला हवे, असा टोला
शिवसेनेने लगावला आहे.

‘हिंदू हिंसक आहे’, याचा अर्थ काय?, असा सवाल उपस्थित करत
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सीताराम येचुरी यांच्यावर
टीका केली. असत्यावर सत्याचा विजय, हा संदेश रामायण आणि
महाभारताने दिला आहे. राम, कृष्ण आणि अर्जुन ही सत्याची
प्रतिकं आहेत. याला कुणी ‘हिंसक’ असे लेबल लावणार असेल तर
उद्या पाकिस्तानविरुद्ध आपले जवान जी लढाई लढत आहेत, त्याला
हिंसक म्हटलं जाईल. काश्मिरातील पाकपुरस्कृत
दहशतवादाविरोधात जी कारवाई केली जाते, ती कारवाई हिंसक
ठरवली जाईल, असा निशाणाच राऊत यांनी साधला.

हिंदूवर हल्ला करायचा आणि त्या माध्यमातून स्वत:
धर्मनिरपेक्ष असल्याचं दाखवायचं, हा सीताराम येचुरी यांच्या
विचारधारेचा एकमेव उद्देश आहे. म्हणून येचुरी यांना जर
रामायण आणि महाभारत हिंसाचाराने व्यापलेले वाटत असेल तर
त्यांनी सर्वात आधी आपले ‘सीताराम’ हे नाव बदलायला हवे, असा
टोला राऊत यांनी लगावला.

 

मिळवा देशबातम्या(india news News in
Marathi)
मराठी
बातम्या( Marathi News) तुमच्या
मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi
News App …आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट

india
news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी
मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा
Web Title if sitaram yechury has problem
with ramayan mahabharat he should change his first name sitaram
shiv sena

(मराठी बातम्या
from Maharashtra Times , TIL Network)

Get
India news, latest marathi news headlines from all states
of India. Stay updated with us to get latest India news in marathi.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *