photo 70660075 - Article 370: ३७० कलम हटविण्याचा निर्णय लोकशाही विरोधी:
प्रियांका गांधी 
unconstitutional': priyanka gandhi

Article 370: ३७० कलम हटविण्याचा निर्णय लोकशाही विरोधी: प्रियांका गांधी unconstitutional’: priyanka gandhi

मराठी बातम्या


जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या निर्णयावर काँग्रेसच्या
महासचिव प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदाच भाष्य करताना केंद्र
सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘३७० कलम लोकशाही मार्गाने
हटविण्यात आलं नाही. हे कलम हटविण्याची सरकारची पद्धत असंवैधानिक
आहे,’ अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Aug 13, 2019, 07:33PM IST

X

70658010 - Article 370: ३७० कलम हटविण्याचा निर्णय लोकशाही विरोधी:
प्रियांका गांधी 
unconstitutional': priyanka gandhi

सर्वाधिक लोकप्रिय

सोनभद्र: जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम
हटविण्याच्या निर्णयावर काँग्रेसच्या महासचिव
प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदाच भाष्य करताना केंद्र
सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘३७० कलम लोकशाही मार्गाने
हटविण्यात आलं नाही. हे कलम हटविण्याची सरकारची पद्धत
असंवैधानिक आहे,’ अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली
आहे.

उत्तर प्रदेशातील
सोनभद्र येथील उम्मा गावात जमिनीच्या वादातून झालेल्या
हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियांका
गांधी आल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना
३७० कलमावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारने ३७० कलम
हटविताना लोकशाही मार्गाचा अवलंब केला नाही. त्यामुळे सरकारचा
हा निर्णय संविधान विरोधी आहे. अशा गोष्टी करताना नियम आणि
कायद्यांचं पालन करावं लागतं. नेमकं तेच या सरकारने केलेलं
नाही, असं त्या म्हणाल्या. प्रियांका यांनी उम्मा गावातील
मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. १९
जुलै रोजी प्रियांका गांधी यांना सोनभद्रला जाण्यापासून
रोखण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांनी धरणे आंदोलन केलं होतं.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी
प्रियांका यांची सोनभद्रमधील भेट ही राजकीय स्टंट असल्याचं
म्हटलं आहे. सोनभद्रमध्ये जे हत्याकांड झालं त्याचं त्याला
खऱ्या अर्थानं काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसच्या जुन्या
नेत्यांच्या कर्मांमुळेच आज ही परिस्थिती पाह्यला मिळाली
आहे. त्यामुळे प्रियांका यांनी सोनभद्रला जाऊन जुन्या

काँग्रेस नेत्यांनी केलेल्या पापांचं प्रायश्चित केलं
पाहिजे, अशी टीका शर्मा यांनी केली.

priyanka - Article 370: ३७० कलम हटविण्याचा निर्णय लोकशाही विरोधी:
प्रियांका गांधी 
unconstitutional': priyanka gandhi

In Videos:
कलम ३७० हटविण्याचा निर्णय लोकशाही विरोधी: प्रियांका

 

Get
India news, latest marathi news headlines from all states
of India. Stay updated with us to get latest India news in marathi.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *