1565725695 Master - maharashtra floods: कोल्हापुरात ६४%, सांगलीत ५३% जास्त पाऊस!

additional rainfall till august

maharashtra floods: कोल्हापुरात ६४%, सांगलीत ५३% जास्त पाऊस! additional rainfall till august

मराठी बातम्या


मुंबई: महाराष्ट्रातील गेल्या दहा वर्षांमधील
आॉगस्ट महिन्यापर्यंतची पावसाची आकडेवारी हाती आली असून महापुराचा
फटका बसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा ६४ टक्के
अतिरिक्त तर सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा ५३ टक्के अतिरिक्त पाऊस
झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या अतिरिक्त पावसानेच या
दोन्ही जिल्ह्यांत हाहाकार उडवला.

जून ते ऑगस्टपर्यंत गेल्या दहा वर्षांत झालेल्या पावसाची आकडेवारी
पुढीलप्रमाणे…

१ जून ते ११ ऑगस्ट २०१०

> मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा,
उस्मानाबाद, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, बुलडाणा, बीड, जालना,
परभणी, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली,
भंडारदरा येथे अतिरिक्त पावसाची नोंद झाली होती.

> सांगलीमध्ये एकूण ३८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. हा
पाऊस सरासरीहून २१ टक्के अतिरिक्त होता. कोल्हापुरात १२६९
मिलीमीटर पाऊस नोंदला गेला होता. हा पाऊस सरासरीहून २२ टक्के
अतिरिक्त होता.

१ जून ते २४ ऑगस्ट २०११

> मुंबई उपनगर, रत्नागिरी, सातारा, बीड, सिंधुदुर्ग येथे
अतिरिक्त पाऊस होता.

> कोल्हापूरमध्ये केवळ १ टक्के पाऊस अतिरिक्त तर सांगलीमध्ये
सरासरीहून १८ टक्के कमी पावसाची नोंद होती. दोन्ही जिल्ह्यांमधील
पाऊस हा सरासरीच्या श्रेणीमधील होता.

(ऑगस्टमधील पहिल्या दोन आठवड्यांपर्यंतची आकडेवारी उपलब्ध नाही.)

१ जून ते १५ ऑगस्ट २०१२

> केवळ साताऱ्यामध्ये अतिरिक्त पाऊस होता. तर मुंबई शहर, मुंबई
उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर,
नंदूरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, जालना, बीड,
उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वर्धा येथे पाऊस
सरासरीहून २० ते ५९ टक्के या श्रेणीमध्ये कमी होता.

> कोल्हापूरात सरासरीहून २३ टक्के तर सांगलीमध्ये सरासरीहून ३८
टक्के पाऊस या काळात कमी नोंदला गेला होता.

१ जून ते १४ ऑगस्ट २०१३

> सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, उपनगर, ठाणे,
नाशिक, अहमदनगर, पुणे, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, लातूर,
नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा,
चंद्रपूर, बुलडाणार, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये
पाऊस सरासरीपेक्षा अतिरिक्त होता. हा पाऊस २० किंवा त्याहून अधिक
टक्क्यांनी जास्त होता.

> कोल्हापूर आणि सांगलीमध्ये हा पाऊस सरासरीच्या श्रेणीमध्ये
होता. कोल्हापूरात १२ टक्के तर सांगलीत ७ टक्के पाऊस सरासरीहून
अधिक होता.

१ जून ते २७ ऑगस्ट २०१४

> या कालावधीत कोणत्याही जिल्ह्यात पाऊस अतिरिक्त नोंदला गेला
नाही.

> रत्नागिरी, उस्मानाबाद, बीड, लातूर, जालना, औरंगाबाद, जळगाव,
नंदूरबार येथे पाऊस सरासरीहून कमी होता. तर परभणी, हिंगोली आणि
नांदेडमध्ये या कालावधीत तुरळक पावसाची नोंद झाली. उर्वरित
जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीच्या श्रेणीमध्ये होता.

> कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पाऊस
सरासरीच्या श्रेणीमध्ये होता. कोल्हापुरात १९ टक्के कमी तर
सांगलीमध्ये १३ टक्के सरासरीहून जास्त पाऊस नोंदला गेला.

(ऑगस्टमधील पहिल्या दोन आठवड्यांपर्यंतची आकडेवारी उपलब्ध नाही.)

१ जून ते १२ ऑगस्ट २०१५

> सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, ठाणे, पुणे,
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद,
औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, जळगाव, यवतमाळ, चंद्रपूर,
गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीहून कमी होता. बीड, परभणी,
लातूरमध्ये पाऊस तुरळक नोंदला गेला. केवळ मुंबई उपनगर, नाशिक,
धुळे, नंदूरबार, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर,
गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरीची श्रेणी
गाठली.

> कोल्हापूरमध्ये ४८ टक्के तर सांगलीमध्ये ४७ टक्के पाऊस
सरासरीहून कमी होता.

१ जून ते १० ऑगस्ट २०१६

> रत्नागिरी, रायगड, मुंबई उपनगर, पालघर, नाशिक, पुणे, सातारा,
सांगली, सोलापूर, अहमदनगर, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती,
यवतमाळ, लातूर, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे सरासरीहून
अतिरिक्त पाऊस नोंदला गेला.

> कोल्हापुरात पाऊस सरासरीच्या श्रेणीमध्ये होता. कोल्हापुरात
८ टक्के पाऊस सरासरीहून अतिरिक्त होता तर सांगलीमध्ये ४६ टक्के
पाऊस अतिरिक्त होता.

१ जून ते ९ ऑगस्ट २०१७

> पालघर, नाशिक आणि पुणे येथे केवळ अतिरिक्त पावसाची नोंद
झाली. कोल्हापूर, सांगली, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम,
यवतमाळ, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, अकोला, अमरावती, चंद्रपूर,
भंडारा, गोंदिया येथे पाऊस सरासरीपेक्षा २० किंवा त्याहून अधिक
टक्के कमी होता.

> कोल्हापुरात २३ तर सांगलीमध्ये ३९ टक्के पाऊस सरासरीहून कमी
नोंदला गेला.

१ जून ते ८ ऑगस्ट २०१८

> मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, पुणे येथे अतिरिक्त पावसाची नोंद
झाली. सांगली, सोलापूर, बीड, जालना, औरंगाबाद, बुलडाणा, जळगाव,
धुळे, नंदूरबार येथे सरासरीहून २० किंवा त्याहून अधिक टक्क्यांनी
पाऊस कमी नोंदला गेला.

> कोल्हापुरात पाऊस सरासरीइतका होता. तर सांगलीमध्ये २८ टक्के
पाऊस सरासरीहून कमी होता.

१ जून ते ७ ऑगस्ट २०१९

> मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर येथे
तीव्र अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. तर मुंबई शहर, रायगड,
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, अहमदनगर, धुळे, नंदूरबार येथे
अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. सोलापूर, बीड, लातूर, परभणी,
जालना, वाशिम, यवतमाळ, गोंदिया येथे पाऊस सरासरीहून अजूनही कमी
आहे.

> कोल्हापूरमध्ये सरासरीहून ६४ टक्के पाऊस अतिरिक्त तर
सांगलीमध्ये सरासरीहून ५३ टक्के पाऊस अतिरिक्त नोंदला गेला
आहे.

Master - maharashtra floods: कोल्हापुरात ६४%, सांगलीत ५३% जास्त पाऊस!

additional rainfall till augustSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *