photo 70666184 - marathi bigg boss News: ... म्हणून बिग बॉसने मध्येच खेळ
थांबवला 
bigg boss stopped the game

marathi bigg boss News: … म्हणून बिग बॉसने मध्येच खेळ थांबवला bigg boss stopped the game

मराठी बातम्या


बिग बॉसच्या घरात एरवी सदस्यांमध्ये वादावादी होताना दिसते पण आज
पुन्हा एकदा बिग बॉसने सदस्यांचा खेळ बघून टास्क थांबविण्याचा
निर्णय घेतला. विशेष म्हणजे हा कॅप्टन्सी टास्क होता परंतु बळाचा
वापर केला गेल्याने बिग बॉसने हा टास्क थांबविला आणि काही वेळाने
तो रद्द केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Aug 14, 2019, 12:05AM IST


70666184 - marathi bigg boss News: ... म्हणून बिग बॉसने मध्येच खेळ
थांबवला 
bigg boss stopped the game

… म्हणून बिग बॉसने मध्येच खेळ थांबवला

मुंबई : बिग बॉसच्या घरात एरवी सदस्यांमध्ये वादावादी होताना
दिसते पण आज पुन्हा एकदा बिग बॉसने सदस्यांचा खेळ बघून टास्क
थांबविण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे हा कॅप्टन्सी टास्क
होता परंतु बळाचा वापर केला गेल्याने बिग बॉसने हा टास्क
थांबविला आणि काही वेळाने तो रद्द केला.

कॅप्टन्सी टास्क मध्ये दोन टीम होत्या. एक शिवची टीम होती आणि
दुसरी
किशोरी शहाणे यांची टीम होती. टास्क खेळत असताना शिवला
राग आला आणि त्या रागाच्या भरात तो आरोहच्या हाताला चावला.
आरोह आणि शिवमध्ये वादावादी झाली. शिव आणि आरोहच्या वादात
शिवची बाजू घेत वीणा मध्ये पडली. त्यामुळे आरोहचा पारा चढला.
वीणा आणि शिवच्या बोलण्याचा आरोहला इतका राग आला की, ‘इथून
पुढे मी एकही टास्क खेळणार नाही’ अशी घोषणाच आरोहने रागाच्या
भरात केली.

‘बिग बॉस’ विषयी सर्व काही जाणून
घेण्यासाठी इथं क्लिक करा

आरोहला चावल्यने शिवने नियमांचे उल्लंघन केले म्हणून बिग
बॉसने घोषणा केली की, हा खेळ बिग बॉस कडून पुढील सूचना
मिळेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. त्यानंतर बिग बॉसने
सूचना केली की, हा खेळ रद्द करण्यात येत आहे कारण हा बारावा
आठवडा आहे. प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. खेळ पाहण्यात
रंगत यावी असं प्रेक्षकांना वाटत होतं पण तुम्ही फक्त
एकमेकांशी अशी मारामारी आणि बळाचाच वापर करताना दिसत आहात.
त्यात शिवने केलेली जी चूक आहे त्यामुळे हा खेळ रद्द
करण्यात येत आहे. शिवला त्याने केलेल्या कृत्याची बिग बॉसने
शिक्षाही केली. कॅप्टन्सी टास्कमधून शिवला बाहेर काढण्यात
आलं ही बिग बॉसने शिवला शिक्षा केल्याने शिव थेट नॉमिनेशन
प्रक्रियेत तो गेला आणि किशोरी घराची कॅप्टन झाली.

 Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *