photo 70665558 - mumbai to goa flight: आश्चर्य! गोव्यात कुत्र्यांनी एअर
इंडियाचं विमान रोखलं 
pilot aborted landing due to dogs at runway 
Times

mumbai to goa flight: आश्चर्य! गोव्यात कुत्र्यांनी एअर इंडियाचं विमान रोखलं pilot aborted landing due to dogs at runway Times

मराठी बातम्या


गोव्यात दाबोली विमानतळावर कुत्र्यांनी विमानाचं लँडिग रोखल्याची
आश्चर्यकारक घटना घडली आहे. दाबोली विमानतळाच्या धावपट्टीवर अचानक
५-६ कुत्र्यांनी मुक्तसंचार सुरू केल्याने एअर इंडियाच्या
विमानाचा लँडिंगचा प्रयत्न फसला. त्यामुळे विमानाला हवेतच घिरट्या
घालून दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करावा लागल्याचा दावा एका
प्रवाशाने केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Aug 13, 2019, 11:04PM IST


70665558 - mumbai to goa flight: आश्चर्य! गोव्यात कुत्र्यांनी एअर
इंडियाचं विमान रोखलं 
pilot aborted landing due to dogs at runway 
Times

आश्चर्य! गोव्यात कुत्र्यांनी एअर इंडियाचं विमान रोखलं

पणजी: गोव्यात दाबोली विमानतळावर
कुत्र्यांनी विमानाचं लँडिग रोखल्याची आश्चर्यकारक घटना घडली
आहे. दाबोली विमानतळाच्या धावपट्टीवर अचानक ५-६ कुत्र्यांनी
मुक्तसंचार सुरू केल्याने एअर इंडियाच्या विमानाचा लँडिंगचा
प्रयत्न फसला. त्यामुळे विमानाला हवेतच घिरट्या घालून
दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करावा लागल्याचा दावा एका
प्रवाशाने केला आहे.

आज पहाटे ३ वाजता ही घटना घडली. हे विमानतळ नौदलाच्या ताब्यात
असून नौदलाचा तेथे हवाईतळ आहे. हे विमान मुंबईहून गोव्याला
रवाना झाले होते. मात्र दाबोली विमानतळाच्या धावपट्टीवर पाच
ते सहा कुत्रे आले. त्यामुळे या विमानाची लँडिंग होऊ शकली
नाही. पायलटने धावपट्टीवर विमान उतरण्याच्या काही सेकंद आधी
विमानाची लँडिंग थांबवली. त्यानंतर पुन्हा उड्डाण करून १५
मिनिटानंतर विमानाची लँडिंग केली. याबाबत पायलटला विचारले
असता धावपट्टीवर ५-६ कुत्रे असल्याचं त्यांनी सांगितलं, असं
ट्विट विमानातील एक प्रवासी गोविंद गावकर यांनी केलं आहे. तर
विमानतळ परिसरात २०० श्वान
असल्याचं नौदलानं सांगितलं. दरम्यान काँग्रेस नेते आणि माजी
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी
केली आहे.

 

Get
India news, latest marathi news headlines from all states
of India. Stay updated with us to get latest India news in marathi.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *