1 1565766014 - राज्यातील पूरस्थितीबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली
मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चा करून मागण्यांचे दिले निवदेन

राज्यातील पूरस्थितीबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चा करून मागण्यांचे दिले निवदेन

ठळक बातम्या


चंद्रकांत शिंदे, | Update – Aug 14, 2019, 12:29 PM IST

घरे बांधून देणे, पशुधनाची भरपाई यांसाह इतर मागण्यांचे
मुख्यमंत्र्यांना दिले निवदेन

1 1565766014 - राज्यातील पूरस्थितीबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली
मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चा करून मागण्यांचे दिले निवदेन


मुंबई – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे
अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली
कॉंग्रेसच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत चर्चा
केली.


पूरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. पशुधन नष्ट झाले
आहे. लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. व्यावसायिकांचे
मोठे नुकसान झाले आहे त्यांना नुकसानभरपाई द्यावी.
शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पूरामुळे
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे
आणि त्यांना नविन कर्ज उपलब्ध करून द्यावे. शेतक-यांना
प्रतिहेक्टरी ६० हजार रूपये मदत द्यावी. बाजार
भावाप्रमाणे पशुधनाच्या नुकसानीची भरपाई द्यावी. पडझड
झालेली घरे सरकारने बांधून द्यावीत या व इतर मागण्यांचे
निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.

या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, प्रदेश काँग्रेसचे
कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत,आ. बसवराज पाटील, माजी
मंत्री नसीम खान, कृपाशंकर सिंह, विधान परिषदेतील
काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे, प्रचार समितीचे
अध्यक्ष नाना पटोले, आ. विरेंद्र जगताप, आ. हुस्नबानो
खलिफे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता
टोकस, प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस पृथ्वीराज साठे
आदी उपस्थित होते.

blank src - राज्यातील पूरस्थितीबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली
मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चा करून मागण्यांचे दिले निवदेन
blank src - राज्यातील पूरस्थितीबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली
मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चा करून मागण्यांचे दिले निवदेनSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *