photo 70671656 - oneplus: सप्टेंबरमध्ये लाँच होणार वनप्लसचा स्मार्ट टीव्ही -
oneplus finally revealed the name and logo of its tv 
Times

oneplus: सप्टेंबरमध्ये लाँच होणार वनप्लसचा स्मार्ट टीव्ही – oneplus finally revealed the name and logo of its tv Times

मराठी बातम्या


मुंबईः वनप्लस
ही चिनी कंपनी दर्जेदार स्मार्टफोन्स बनवण्यासाठी लोकप्रिय आहे. पण
आता वनप्सल लवकरच स्मार्ट टीव्हीही लाँच करण्याच्या तयारीत आहे.
अलीकडेच कंपनीनं या टीव्हीची घोषणा केली असून टीव्हीचं नावही जाहीर
केलं आहे. ‘वनप्लस
टीव्ही’ असं नाव आहे. तर, टीव्हीचा अधिकृत लोगोही लाँच केला
आहे.

स्मार्ट टीव्हीच्या नावासाठी कंपनीनं एका स्पर्धेचं आयोजन केलं
होतं. यात युजर्सकडून स्मार्ट टीव्हीसाठी नावं आणि लोगोचं डिझाइन
सुचवण्यासाठी आवाहन केलं होतं. यात अनेकांनी वनप्लस टीव्हीसाठी
नावं सुचवली होती. या स्पर्धेत विजेयी झालेल्या स्पर्धकाला भरघोष
बक्षिसे देण्याचंही कंपनीनं जाहीर केलं आहे.

सप्टेंबरमध्ये होणार लाँच

वनप्लस टीव्ही सप्टेंबर २०१९च्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता
आहे. सूत्रांनुसार, २६ सप्टेंबरला टी.व्ही लाँच होईल असे
सांगण्यात येत आहे. वनप्लसचा हा टीव्ही अँड्रोइड असून अनेक
वेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे.

टीव्हीमध्ये नसणार ओएलइडी पॅनल

वनप्लस टी.व्हीमध्ये ओएलइडी पॅनल नसणार असं सांगण्यात येत आहे.
एका अहवालानुसार, वनप्लस टीव्ही ४३, ५५,६५ आणि ७५ इंच
वेरियंटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. या टीव्हीचा हाय-एंड
वेरियंट 4kHDR डिस्प्लेला सपोर्ट करणार.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *