photo 70673774 - Rahul Gandhi: मलिकजी, काश्मीरमध्ये कधी येऊ?: राहुल गांधी -
when should i come to kashmir asks rahul gandhi 
Times

Rahul Gandhi: मलिकजी, काश्मीरमध्ये कधी येऊ?: राहुल गांधी – when should i come to kashmir asks rahul gandhi Times

मराठी बातम्या


काश्मीर प्रश्नावरून सुरु झालेला वाद आता शमता शमत नाहीये. आता
यातच काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेस नेते राहुल
गांधी यांच्यातील ट्विटरवरील भांडण विकोपाला पोहोचलं आहे. मी
काश्मीरमध्ये येऊन सामान्यांना कधी भेटू असा प्रश्नच सत्यपाल मलिक
यांना राहुल गांधींनी विचारला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Aug 14, 2019, 02:18PM IST


70673774 - Rahul Gandhi: मलिकजी, काश्मीरमध्ये कधी येऊ?: राहुल गांधी -
when should i come to kashmir asks rahul gandhi 
Times

मलिकजी, काश्मीरमध्ये कधी येऊ?: राहुल गांधी

दिल्ली: काश्मीर प्रश्नावरून सुरु झालेला
वाद आता शमता शमत नाहीये. आता यातच काश्मीरचे राज्यपाल
सत्यपाल मलिक आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यातील
ट्विटरवरील भांडण विकोपाला पोहोचलं आहे. मी काश्मीरमध्ये येऊन
सामान्यांना कधी भेटू असा प्रश्नच सत्यपाल मलिक यांना राहुल
गांधींनी विचारला आहे.

भाजप सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर काँग्रेसने अनेक
पातळ्यांवर या निर्णयाचा विरोध केला आहे. काश्मिरमध्ये
हिंसाचार होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याकडे लक्ष
द्यावे असं ट्विट राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी केलं
होतं. त्यावर काश्मीरमध्ये येऊन राहुल गांधींनी जमिनीवरील
परिस्थितीचा आढावा घ्यावा अशी प्रतिक्रिया सत्यपाल मलिक
यांनी दिली होती. तसंच त्यांच्यासाठी विशेष विमानही
पाठवण्यास आम्ही तयार आहोत असंही ते म्हणाले होते. त्यावर
राहुल गांधींनी आता उत्तर दिलं आहे.

Dear Maalik ji, I saw your feeble reply to my
tweet. I accept your invitation to visit Jammu
& Kashmir and meet… https://t.co/jD1mSy2jdo

— Rahul Gandhi (@RahulGandhi)

1565761263000

‘मलिकजी मी काश्मीरमध्ये येऊन तेथील लोकांना कोणत्याही
निर्बंधांशिवाय भेटायचे तुमचे आमंत्रण स्वीकारतो. तुम्हीच
सांगा मी कधी येऊ?’ काश्मीरमध्ये सर्व विरोधी पक्ष नेते
येऊन सामान्यांना भेटू इच्छितात अशा आशयाचं ट्विटही राहुल
गांधींनी काही दिवसांपूर्वी केलं होते. तसंच विमानाची काहीच
गरज नाही आम्हाला लोकांना भेटू द्या असंही गांधींनी
सांगितलं आहे. यावर मलिक काय उत्तर देतात हे पाहणं
महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Get
India news, latest marathi news headlines from all states
of India. Stay updated with us to get latest India news in marathi.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *