photo 70672423 - rescued leopard cub: अखेर बछड्याची अन् माऊलीची भेट झाली... -
rescued leopard cub reunited with mother in nashik 
Times

rescued leopard cub: अखेर बछड्याची अन् माऊलीची भेट झाली… – rescued leopard cub reunited with mother in nashik Times

ठळक बातम्या


शनिवारी विहिरीत पडल्यानंतर बिबट्याच्या पाच महिन्यांच्या मादी
बछड्याची त्याच्या आईसोबत भेट झालेली नव्हती. तिन्ही रात्री आई
तिथे येत असल्याचे दिसत होते. पण, ती त्या बछड्याला घेऊन जात
नव्हती. या दोघांचा एकत्रिक नैसर्गिक अधिवास पुन्हा सुरु व्हावा
म्हणून वनविभागाचे बचाव पथक तेथे तळ ठोकून होते. अखेरीस मंगळवारी
रात्री बछडा अन् आईची भेट झाली. माऊलीने बछड्याला गोंजारात
एकत्रित नैसर्गिक अधिवासाला पुन्हा सुरुवात केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Aug 14, 2019, 12:47PM IST


70672423 - rescued leopard cub: अखेर बछड्याची अन् माऊलीची भेट झाली... -
rescued leopard cub reunited with mother in nashik 
Times

अखेर बछड्याची अन् माऊलीची भेट झाली…

नाशिक: शनिवारी विहिरीत पडल्यानंतर बिबट्याच्या पाच
महिन्यांच्या मादी बछड्याची त्याच्या आईसोबत भेट झालेली
नव्हती. तिन्ही रात्री आई तिथे येत असल्याचे दिसत होते. पण,
ती त्या बछड्याला घेऊन जात नव्हती. या दोघांचा एकत्रिक
नैसर्गिक अधिवास पुन्हा सुरु व्हावा म्हणून वनविभागाचे बचाव
पथक तेथे तळ ठोकून होते. अखेरीस मंगळवारी रात्री बछडा अन्
आईची भेट झाली. माऊलीने बछड्याला गोंजारात एकत्रित नैसर्गिक
अधिवासाला पुन्हा सुरुवात केली.

निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथे शनिवारी पाच महिने वय असलेला
मादी बछडा विहिरीत पडला. दोन तासांच्या परिश्रमानंतर
वनविभागाच्या बचाव पथकाने त्या बछड्याला विहिरीबाहेर काढले.
पशुवैद्यकीय दवाखान्यात तपासणी केली गेली. यानंतर बछड्याची
आणि आईची भेट व्हावी म्हणून बछड्याला विहिरीच्या परिसरात एका
लहानश्या खड्ड्यात ठेवले गेले. तेथे संचारबंदी करुन ३ ट्रॅप
आणि ८ आयटी कॅमेऱ्याद्वारे त्या ठिकाणी बचाव पथकाने वॉच
ठेवला. शनिवार ते सोमवार नियमितपणे रात्री बछड्याची आई त्या
ठिकाणी आली. तिला बछडा इथेच असल्याची जाणीव झाली. बछड्याच्या
आजूबाजूला असलेले दगड तिने सरकवले. त्या दोघांनी एकमेकांना
डरकाळी देत ओळखही दिली. बराचवेळ मादी
बिबट्या बछड्याच्या आसपास वावरली. पण, बछड्याच्या अंगावर
असलेले कापड आणि छोटासा पिंजरा तिने तिने हटविला नाही. अखेरीस
मंगळवारी पाच वर्षांच्या त्या आईने बछड्याच्या जवळ जात पुन्हा
डरकाळी फोडली. बचाव पथकाने खटकीच्या सहाय्याने तिथला पिंजरा
बाजूला केला. त्या दोघांची नजरानजर झाली. बछडा आईकडे धावत
गेला. आईने त्याला गोंजारले आणि त्यांच्या एकत्रिक नैसर्गिक
अधिवासाला पुन्हा नव्याने सुरुवात झाली.

नाशिक: अखेर बछड्याची अन् माऊलीची भेट झाली; गेल्या
तीन दिवसांपासून बछडा होता आईच्या प्रतिक्षेत
https://t.co/uMw0YVnIJC

— Maharashtra Times (@mataonline)

1565763825000

 

Follow Maharashtra Times to get today’s Latest Marathi News and
current
Marathi News Headlines from India and around the world.
Find all breaking events from Maharashtra, India, business,
technology and world.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *