photo 70672701 - sachin tendulkar first test centurysachin tendulkar: आठवावा
प्रताप! सचिन नावाचा 'सूर्य' आजच तळपला होता... 
hit his first test century in august 14 1990 against england |
Maharashtra Times

sachin tendulkar first test centurysachin tendulkar: आठवावा प्रताप! सचिन नावाचा ‘सूर्य’ आजच तळपला होता… hit his first test century in august 14 1990 against england | Maharashtra Times

मराठी बातम्या


१४ ऑगस्ट हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सोनेरी दिवस…याच
दिवशी भारतीय क्रिकेटमधील ‘सूर्य’ तेजानं तळपला होता. १९९० साली
आजच्या दिवशी सचिननं पहिलंवाहिलं कसोटी शतक झळकावलं होतं.
इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमधील सामन्यात ११९ धावांची तुफानी खेळी
केली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Aug 14, 2019, 01:20PM IST


70672701 - sachin tendulkar first test centurysachin tendulkar: आठवावा
प्रताप! सचिन नावाचा 'सूर्य' आजच तळपला होता... 
hit his first test century in august 14 1990 against england |
Maharashtra Times

आठवावा प्रताप! सचिन नावाचा ‘सूर्य’ आजच तळपला होता…

नवी दिल्ली:

१४ ऑगस्ट हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सोनेरी दिवस…याच
दिवशी भारतीय क्रिकेटमधील ‘सूर्य’ तेजानं तळपला होता. १९९०
साली आजच्या दिवशी सचिननं पहिलंवाहिलं कसोटी शतक झळकावलं
होतं. इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमधील सामन्यात ११९ धावांची
तुफानी खेळी केली होती.

इंग्लंडनं या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ग्राहम
गूच, मायकल आर्थटन आणि रॉबिन स्मिथच्या शतकांच्या जोरावर
पहिल्या डावात ५१९ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर
फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या पहिल्या
डावाची सुरुवात चांगली झाली नाही. रवी शास्त्री आणि नवज्योत
सिंग सिद्धू हे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. त्यानंतर
मोहम्मद अझहरुद्दीन आणि संजय मांजरेकर यांनी डाव सावरला.
अझहरुद्दीनं १७९ धावा, तर मांजरेकरनं ९३ धावा केल्या
होत्या. सचिननंही पहिल्या डावात ६८ धावा केल्या होत्या.
भारतानं पहिल्या डावात ४३२ धावा केल्या होत्या. इंग्लंडनं
दुसरा डाव ४ बाद ३२० धावांवर घोषित केला होता. इंग्लंडकडून
अॅलन लँबनं १०९ धावा केल्या होत्या. भारतासमोर ४०८ धावांचं
लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. भारताचे १८३ धावांवर सहा फलंदाज
बाद झाले होते. सचिननं ११९ धावा आणि प्रभाकर यानं ६७ धावा
करून सामना अनिर्णित राखला होता. आयसीसी आणि बीसीसीआयने
ट्विट करून क्रिकेटच्या इतिहासातील सोनेरी पान पुन्हा
उलगडले. सचिनचं हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं शतक
होतं. त्यानंतर त्यानं शतकांचं शतकही पूर्ण केलं. कसोटीत ५१
आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके ठोकली आहेत. कसोटीत
सचिनची नाबाद २४८ ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

#ThisThatDayYear: Rewind to 1990 and the world
witnessed @sachin_rt’s maiden international ton.
At the tender age o… https://t.co/yb73JtH5YZ

— BCCI (@BCCI)
1565753400000

 Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *