photo 70862520 - पीएफचा लाभ आता ड्रायव्हर आणि घरगड्यांनाही

पीएफचा लाभ आता ड्रायव्हर आणि घरगड्यांनाही

मराठी बातम्याphoto 70862520 - पीएफचा लाभ आता ड्रायव्हर आणि घरगड्यांनाही

ईटी वृत्त, नवी दिल्ली

मासिक किमान १५ हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तींनाच भविष्य निर्वाह निधीची () सुविधा मिळत असली तरी यात लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या एका योजनेनुसार चालक, नोकरचाकर अथवा स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींनाही पीएफचा लाभ मिळणार आहे. यासाठी संबंधित कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत.

किमान २० कर्मचारी असणाऱ्या आस्थापनांच्या मालकांना पीएफ योजना राबवणे बंधनकारक आहे. पीएफची एकूण रक्कम २४ टक्के असून यासाठी कर्मचारी व आस्थापन यांच्याकडून प्रत्येकी १२ टक्के अंशदान दिले जाते. मात्र पीएफसाठी पात्र होण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याचा मासिक पगार किमान १५ हजार रुपये असणे आवश्यक आहे. कर्मचारी निर्वाह निधी संघटनेची (ईपीएफओ) गंगाजळी सध्या साडेदहा लाख कोटी रुपये आहे. मात्र १५ हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणारे कर्मचारी/कामगार पीएफच्या सुविधेपासून वंचित राहतात.

या पार्श्वभूमीवर सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवण्याच्या हेतूने या वंचित घटकांना पीएफच्या कक्षेत सामावून घेण्याची योजना सरकारने आखली आहे. यामुळे चालक, नोकरचाकर, घरगडी, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती आदींना पीएफचा लाभ मिळू शकेल. यासाठी कामगार मंत्रालयाकडून कर्मचारी निर्वाह निधी कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. या बदलांनंतर कोणत्याही प्रकारच्या आस्थापनात पीएफचा दर व अंशदान किती असावे हे निश्चित करण्याचा अधिकार सरकारला मिळेल.

कामगार मंत्रालयाकडून मसुदा जाहीर

एम्प्लॉयी प्रॉव्हिडण्ट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन्स अॅक्ट १९५२ (ईपीएफ अँड एमपी) या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालयातर्फे एक मसुदा जाहीर करण्यात आला आहे. आवश्यक आढावा घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या आस्थापनांमध्ये कामगार/कर्मचाऱ्यांचे पीएफमध्ये किती अंशदान असावे यासंबंधी निर्णयांमध्ये अधिसूचनेद्वारे बदल करण्याचा सरकारला अधिकार असेल, असा प्रस्ताव या मसुद्यामध्ये देण्यात आला आहे. या मसुद्यावर संबंधित घटकांकडून २२ सप्टेंबरपर्यंत सूचना व आक्षेप मागवण्यात आले आहेत.

काळानुरूप बदल आवश्यक

देशाच्या औद्योगिक व आर्थिक रचनेत कमालीचे बदल होत असून कामगारांना नवनवीन ठिकाणी संधी प्राप्त होत आहेत. यामुळे या कामगारांना अनेकदा एका ठिकाणचे काम सोडून दुसरीकडे जावे लागते. सेवाक्षेत्र व कंत्राटी पद्धतीमध्येही वाढ होत आहे. यामुळे पीएफसंबंधी कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी तळटीपही या मसुद्यासोबत जोडली आहे.

ईपीएफओची गंगाजळी

१०.५ लाख कोटी रु.

पीएफसाठी आवश्यक पगार

मासिक १५ हजार रु.

पीएफसाठी किमान कर्मचारी: २०Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *