photo 71069767 - त्र्यंबकला धुवाँधार

त्र्यंबकला धुवाँधार

ठळक बातम्याphoto 71069767 - त्र्यंबकला धुवाँधार

B२४ तासांमध्ये १४१ मिमी पाऊस

B

म. टा. खास प्रतिनिधी नाशिक

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर केवळ हलकी सलामी देणारा पाऊस जिल्ह्यात पुन्हा परतला आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी साडे आठपर्यंतच्या २४ तासांत तब्बल ५८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गंगापूर धरण समुहाचे पाणलोट क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४१ मिमी पाऊस नोंदविला गेला. पेठमध्ये देखील १२६ मिमी पावसाची नोंद झाली. मंगळवारी मात्र बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली.

सप्टेंबरमध्ये पावसाचा पाहिजे तसा जोर नसल्याचा अनुभव नाशिककर घेत होते. कधी भूरभूर तर कधी हलक्या सरी असे अनेक दिवस पावसाचे स्वरूप राहिले. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने जोरदार कमबॅक केले. नाशिकमध्ये गेल्या आठवड्यातील अखेरच्या टप्प्यात मुसळधार पाऊस होईल, असा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला होता. परंतु, पावसाने जिल्ह्याच्या बहुतांश भागाला हुलकावणी दिली. सोमवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवारी सकाळीसाडे आठ ते मंगळवारी सकाळी साडेआठ या २४ तासांत जिल्ह्यात ५८५.६ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला. गंगापूर धरण समुहाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय पेठमध्ये १२६, सुरगाण्यात ८१.१ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. नाशिकसह इगतपुरी, दिंडोरी, निफाड, सिन्नर, बागलाण, येवला, चांदवड, देवळा, कळवण आणि नांदगाव या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले आहेत. केवळ मालेगाव तालुक्याकडे सोमवारच्या पावसाने पाठ फिरविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

इशारा अन् विश्रांती

नाशिकमध्ये मंगळवारी दुपारी मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिला होता. दुपारी एकनंतर चार तासांत कधीही मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर काही भागात पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या.

===================================

पावसाची तालुकानिहाय झालेली नोंद

तालुका पाऊस (मिमी)

त्र्यंबकेश्वर १४१

पेठ १२६

सुरगाणा ८१.१

इगतपुरी ८०

दिंडोरी ६८

येवला २८

चांदवड १५

नाशिक १४.१

बागलाण ९

नांदगाव ८

सिन्नर ८

निफाड ४

देवळा २.४

कळवण १

मालेगाव ०

एकूण ५८५.६Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *