photo 71068942 - ‘कडकनाथ’चे लोण नाशकात

‘कडकनाथ’चे लोण नाशकात

ठळक बातम्याphoto 71068942 - ‘कडकनाथ’चे लोण नाशकात

१४ लाखांची फसवणूक; सरकारवाडा पोलिस ठाण्यात ३५ शेतकऱ्यांची तक्रार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात गाजत असलेल्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्याची व्याप्ती नाशिकपर्यंत पोहचली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपींनी शेतकऱ्याची तब्बल १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे दिसून येते. या प्रकरणी आणखी ३० ते ३५ तक्रारदार समोर आले असून, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी नाशिक तालुक्यातील सैय्यद प्रिंपी येथील शिवदास भिकाजी साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी सुधीर शंकर मोहिते, हनुमंत शंकर जगदाळे, विजय शेंडे, संदीप सुभाष मोहिते (सर्व रा. इस्मालपूर, जि. सांगली) यांनी मिळून महारयत अॅग्रो इंडिया प्रा. लि. कंपनी स्थापन केली होती. तसेच या कंपनीचे कार्यालय कॅनडा कॉर्नर येथील विराज टॉवर्स येथे सुरू करण्यात आले होते. कंपनीच्या कामाबाबत आणि फसवणुकीच्या प्रकाराबाबत पोलिसांनी सांगितले, की वरील संशयितांनी कडकनाथ कोंबड्याचे पालन पोषण करण्याची जबाबदारी शेतकऱ्याकडे दिलेली होती. फिर्यादी साळुंखे यांनी यासाठी कंपनीला १० लाख रुपये दिले होते. या पैशांच्या आधारे कंपनीने साळुंखे यांना काही दिवस वयाची तब्बल पाच हजार कडकनाथ कोंबडीचे पिल्ले दिली. साळुंखे यांनी तीन महिने कोंबड्याचे पालन पोषण केले. नियमानुसार पूर्ण वाढ झालेली कोंबडी पुन्हा कंपनीच घेणार होती. या बदल्यात कंपनी पैसेही अदा करणार होती. साळुंखे यांच्याकडील पाच हजार पैकी तीन हजार ७०० पिल्लांची वाढ झाली. ठरल्यानुसार कंपनीने सर्व कोंबड्या घेतल्या. मात्र, त्याबदल्यात तीन लाख ७० हजार रुपये दिलेच नाही. अनेक दिवस पाठपुरवा करूनही पैसे मिळत नसल्याने साळुंखे यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. साळुंखे यांच्याकडून सुरुवातीस घेतलेले दहा लाख आणि नंतर कोंबड्याचे पैसे असे मिळून संशयित आरोपींनी तब्बल १३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली. या घटनेचा अधिक तपास पीएसआय बैरागी करीत आहेत.

जबाब नोंदविण्यास प्रारंभ

कडकनाथ पालन घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, साळुंखे यांच्या प्रमाणे ३० ते ३५ शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, त्याचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये संबंधित कंपनीविरोधात यापूर्वीच फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *