photo 71078773 - पेट्रोल, डिझेल दरांमधील रोजच्या बदलांना फाटा

पेट्रोल, डिझेल दरांमधील रोजच्या बदलांना फाटा

मराठी बातम्याphoto 71078773 - पेट्रोल, डिझेल दरांमधील रोजच्या बदलांना फाटा

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींच्या आधारे पेट्रोल, डिझेलच्या किंमती ठरविण्याच्या पद्धतीपासून सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी सध्या फारकत घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळं पेट्रोल, डिझेलचे दर सध्या स्थिर दिसत आहेत. मुंबईत लिटरमागे पेट्रोलचा दर आज ७७.४५ रुपये असून डिझेलचा दर ६८.३२ रुपये आहे. हा दर कालच्या इतकाच आहे.

‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत क्वचितच बदल केला आहे. या तीन महिन्यांमध्ये पेट्रोलचे दर किमान ४३ दिवस तर, डिझेलचे दर ४७ दिवस जैसे थे होते. विशेष म्हणजे, डिझेलच्या किंमतींमध्ये सलग १३ दिवस कुठलाही बदल करण्यात आला नव्हता. तर, पेट्रोलच्या किंमती सलग ८ दिवस स्थिर होत्या. बाजारभावानुसार किंमती ठरविण्याची पद्धत सुरू झाल्यापासून सलग इतके दिवस दर स्थिर राहण्याचा हा एक प्रकारचा विक्रमच मानला जात आहे.

आधी पंधरवड्याला, आता दररोज

पूर्वी दर १५ दिवसांनी पेट्रोल, डिझेलच्या किंमतींचा आढावा घेतला जात असे. तब्बल तीन वर्षे ही पद्धत सुरू होती. जून २०१७ पासून दररोज दराचा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर निवडणुकांचा काळ वगळता तेल कंपन्यांनी जवळपास रोजच किंमतींचा आढावा घेतला आहे. ती पद्धत गेल्या काही दिवसांपासून खंडित होताना दिसत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *