photo 71084377 - मुंबई-जयपूर एक्स्प्रेसच्या एसी डब्याला आग

मुंबई-जयपूर एक्स्प्रेसच्या एसी डब्याला आग

मराठी बातम्याphoto 71084377 - मुंबई-जयपूर एक्स्प्रेसच्या एसी डब्याला आग

मुंबई : रेल्वे यार्डात देखभाल दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या मुंबई सेंट्रल- जयपूर एक्स्प्रेसच्या थ्री टियर वातानुकुलित डब्याला बुधवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लागली. दुर्घटना घडली तेव्हा या डब्यात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.

संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास बी-३ डब्याला आग लागली. आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे बाजूचा बी-२ डबा सुरक्षित राहिला. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली. ही एक्स्प्रेस नियोजित वेळेनुसार संध्याकाळी ६.५० वाजता सुटणार होती पण आग लागल्याने ती दोन तास उशीरा सुटेल, असेही या प्रवक्त्याने स्पष्ट केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *