240100919img 20190910 wa0 1568173238 - DVM Special : Sangli flood victims get opportunity to play
martyr in Pune 
मिरवणुकीत वादनाची संधी

DVM Special : Sangli flood victims get opportunity to play martyr in Pune मिरवणुकीत वादनाची संधी

ठळक बातम्या


दिव्य मराठी नेटवर्क,,17 | Update – Sep 11, 2019, 09:08 AM IST

पुरामुळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ, रुद्रगर्जना
पथकाने दिली ५० वादकांना संधी

240100919img 20190910 wa0 1568173238 - DVM Special : Sangli flood victims get opportunity to play
martyr in Pune 
मिरवणुकीत वादनाची संधी

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी
होणारी ढोल-ताशा पथके हे उत्सवाचे विशेष आकर्षण असते.
ढोल-ताशा संस्कृती ही पुण्यासोबतच महाराष्ट्रातील इतर
भागातही तेवढीच प्रसिद्ध आहे. यंदा सांगली आणि
कोल्हापूर येथे आलेल्या पुराचा फटका तेथील पथकांनादेखील
बसला आहे. पुरामुळे यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा
करण्याची वेळ आल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून
पथकांनी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. त्यामुळे
पुण्यातील रुद्रगर्जना पथकाने सांगलीतील पूरग्रस्त
भागातील ५० वादकांना विसर्जन मिरवणुकीत वादनाची संधी
उपलब्ध करून दिली आहे.


पुण्याच्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक हे खास आकर्षण
असते. त्यामुळे यंदा सामाजिक बांधिलकी तसेच पथक
संस्कृती जपत रुद्रगर्जना पथकाने हा उपक्रम राबवण्याचे
ठरवले आहे. पथकातील वादक आणि व्यवस्थापक यांनी
घेतलेल्या कष्टांचे मोल जाणत हा उपक्रम राबवण्यासाठी
पुढाकार घेण्यात आला आहे. सांगली येथील सुमारे ५० वादक
यंदा रुद्रगर्जना वाद्यपथकामध्ये सहभागी होऊन आपली कला
सादर करतील. मानाचा पहिला श्री कसबा गणपती तसेच नवसाचा
गणपती हुतात्मा बाबू गेनू मंडळ यांच्या विसर्जन
मिरवणुकीमध्ये हे वादक वादन करणार आहेत. पुण्यातील
जगप्रसिद्ध मिरवणुकांमध्ये सहभागी होण्याची संधी
मिळाल्याबद्दल सांगली येथील वादकांनी पुण्यातील
मंडळांचे आभार मानले आहेत. तसेच मिरवणुकीतही हे वादक
पुणेकरांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने आभार मानणार आहेत.


भव्य शांतिरथातून शारदा गजाननाची मिरवणूक…
अखिल मंडई मंडळाची वैभवशाली विसर्जन मिरवणूक अनंत
चतुर्दशीला सायंकाळी सात वाजता निघणार आहे. यंदा १२६
व्या वर्षानिमित्त पुण्याच्या गणेशोत्सवात प्रथमच
विसर्जन मिरवणुकीच्या इतिहासात भगवान महावीर यांचा
alt147अहिंसा परमो धर्म’ असा शांतीचा संदेश देत
शांतिरथात शारदा-गजानन विराजमान होणार आहेत. तसेच १५
फूट भगवान महावीरांची मूर्ती हे यंदाच्या रथाचे
वैशिष्ट्य आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात
यांनी दिली. शांतिरथाची उंची ३२ फूट इतकी आहे. नवकार
मंत्राचा समावेश रथात असणार आहे. तसेच भगवान
महावीरांच्या आईला पडलेली १४ स्वप्नेदेखील रथात
साकारण्यात आली आहेत. आकर्षक एलईडी लाइट इफेक्ट‌्स आणि
विविधरंगी फुलांची सजावट रथाला असेल. या रथाची संकल्पना
शिल्पकार विशाल ताजणेकर यांची आहे. शिवगर्जना, रमणबाग
ही ढोल-ताशा पथके आणि न्यू गंधर्व ब्रास बँ्रड
मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. खळदकर बंधूंचे सनईवादन
होणार आहे.


विसर्जन मिरवणुकीसाठी यंदा पुण्यात साडेआठ हजार
पोलिस

पुणे : वैभवशाली गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक गुरुवारी
सकाळी १० वाजेपासून महात्मा फुले मंडर्इ येथून सुरू
होणार आहे. ही मिरवणूक शांततेत व विनाअडथळा पार
पडण्यासाठी तब्बल साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात
करण्यात आला आहे. मिरवणुकीच्या प्रमुख ३९ मार्गांवर १६९
सीसीटीव्हीने नजर ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर
बॉम्बशोधक-नाशक पथक, छेडछाड व चोरीविरोधी पथकही तैनात
केले जाणार आहे. शहरामध्ये दाेन हजार गणेश मंडळे आहेत.
त्यापैकी ६०० मंडळे मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर
सहभागी होणार आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *