photo 71076156 - harshavardhan patil to enter in bjp: काँग्रेसला धक्का:
हर्षवर्धन यांचा आज भाजप प्रवेश 
patil to enter in bjp today in the presence of cm devendra fadnavis
and chandrakant patil in mumbai

harshavardhan patil to enter in bjp: काँग्रेसला धक्का: हर्षवर्धन यांचा आज भाजप प्रवेश patil to enter in bjp today in the presence of cm devendra fadnavis and chandrakant patil in mumbai

मराठी बातम्या


मुंबई: काँग्रेसचे नेते,
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या उपस्थितीत आज दुपारी ३ वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित
असणार आहेत. प्रवेशापूर्वी आज सकाळी हर्षवर्धन पाटील यांनी
लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. आपल्यावर पक्षात सतत
अन्याय झाल्याने आपण भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे हर्षवर्धन
पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

भारतीय जनता पक्षाता आपण कोणत्याही अटींशिवाय जात असल्याचे
हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे. आपण भाजपत प्रवेश केल्यानंतर
प्रामाणिकपणे काम करू असेही हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील हे नाराज
होते. मागील विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा राष्ट्रवादीचे
उमेदवार दत्तात्रय भारणे यांनी पराभव केला होता. त्यानंतर आगामी
विधानसभा निवडणुकीत ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह पाटील
यांचा होता. आघाडीच्या जागा वाटपातही या जागेवर चर्चा सुरू
असल्याची चर्चा होती. मात्र, काही दिवसांपूर्वी इंदापूर येथे
झालेल्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते
अजित पवार यांच्यावर टीका केली होती. लोकसभेला आम्हाला मदत करा
विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा सोडतो असे आश्वासन राष्ट्रवादी
काँग्रेसने दिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला
विश्वासघात गेला असे म्हणत यांनी हल्लाबोल केला होता. आत्तापर्यंत
आपण संयमाने वागलो मात्र यापुढील काळात आक्रमकपणा बघाच असा इशारा
देत भाजप प्रवेशाचे संकेत मेळाव्यातच दिले होते.

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाने राज्यातील काँग्रेस
-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. हर्षवर्धन पाटील हे
राज्यातील सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.

हर्षवर्धन पाटील यांची आत्तापर्यंतची कामगिरी:

>> हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदार संघांचे
त्यांनी सलग चार वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.
>> यामध्ये सलग तीन वेळेस अपक्ष आमदार म्हणून निवडून
येण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे.
>> युती सरकारच्या काळात ते मंत्रिपदी होते.
>> त्यानंतर राज्यात आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या
आघाडी सरकारमध्येही १४ वर्ष मंत्रिपदावर होते.
>> हर्षवर्धन पाटील यांनी सहा मुख्यमंत्र्यांच्या
मंत्रिमंडळात काम केले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *