1568187768 Master - national animal disease control programme: पंतप्रधान मोदींनी
वेचला कचरा, केली गोसेवा 
in uttar pradesh launches national animal disease control programme

national animal disease control programme: पंतप्रधान मोदींनी वेचला कचरा, केली गोसेवा in uttar pradesh launches national animal disease control programme

मराठी बातम्या


मथुरा: उत्तर प्रदेशातील मथुरा येथे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी दुभत्या गायी, म्हशींना गंभीर आजारांपासून मुक्त
करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या १३, ५०० कोटी रुपयांच्या
लसीकरण योजनेचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी यांनी या
कार्यक्रमाची सुरुवात गोसेवेने केली. यावेळी कचरा व्यवस्थापनाशी
संबंधित महिलांसोबत कचरा वेचून पंतप्रधानांनी लोकांना प्लास्टिकचा
उपयोग न करण्याचे सांकेतिक आवाहन केले. याबरोबरच त्यांनी एकदाच
वापरावच्या प्लास्टिकविरोधी मोहीमचेही उद्घाटन केले.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी पंडित दिनदयाळ उपाध्याय पशुचिकित्सा
विज्ञान विद्यापीठ आणि संशोधन केंद्राच्या कामाची पाहणी केली.
यावेळी इथे आयोजित गुरांच्या जत्रेचे उद्घाटनही केले. यानंतर
त्यांनी पशुपालन आणि पशुपालनाशी संबंधित विभागांच्या विविध
योजनांचाही आढावा घेतला.

Master - national animal disease control programme: पंतप्रधान मोदींनी
वेचला कचरा, केली गोसेवा 
in uttar pradesh launches national animal disease control programme

कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील महिलांची घेतली
भेट

पंतप्रधान मोदी यांनी कचरा आणि भंगारापासून प्लास्टिकच्या पिशव्या
तयार करणाऱ्या मथुरेतील महिलांची भेट घेतली. या महिलांनी
पंतप्रधानांना प्लास्टक व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकही दाखवले.
यावेळी पंतप्रधानांनी प्लास्टिक आणि कचरा वेगळा करणाऱ्या मशीनचाही
उपयोग केला. या जत्रेत मथुरा-वृंदावन नगरच्या वतीने स्वच्छ भारत
अभियानांतर्गत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचा स्टॉलही लावण्यात आला
आहे.

पीएम श्री नरेन्द्र मोदी मथुरा, उत्तर प्रदेश में गौ-सेवा
करते हुए। https://t.co/aa8CfIwCmm

— BJP (@BJP4India)
1568180417000

पशुवैद्यकीय वाहनांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ४० पशुवैद्यकीय वाहनांची
भेटही दिली. पंतप्रधान इथे गंभीर आजारांनी ग्रासलेल्या २५ गुरांची
लाइव्ह सर्जरीही पाहणार आहेत.

Master - national animal disease control programme: पंतप्रधान मोदींनी
वेचला कचरा, केली गोसेवा 
in uttar pradesh launches national animal disease control programmeSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *