PM Modi Mathura: ”ॐ’ आणि ‘गाय’ शब्द ऐकताच काहींना करंट लागतो’ In Uttar Pradesh Under The Pretext Of Cow And Om Times

मराठी बातम्या


मथुरा: ‘ॐ’ हा शब्द कानावर पडताच काही लोकांचे कान
उभे राहतात, काही लोकांनी ‘गाय’ हा शब्द ऐकला तर त्यांच्या अंगावरील
केस उभे राहतात, त्यांना करंट लागतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. देश १६व्या, १७ व्या शतकात
गेला आहे असेच या लोकांना वाटते असे सांगताना, याच लोकांनी देशाचे
वाटोळे केल्याचा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.

मथुरेत विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादावरही
भाष्य केले. अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा
उल्लेख करत मोदी म्हणाले की, दहशतवाद ही एक जागतिक समस्या बनली आहे.
आज दहशतवाद ही एक विचारधाराच बनली आहे. या दहशतवादाची मुळे आपल्या
शेजारीच वाढत आहेत. आम्ही याचा मोठ्या ताकदीने मुकाबला करत आहोत आणि
पुढेही करत राहू, असे मोदी म्हणाले. दहशतवाद्यांना आश्रय आणि
प्रशिक्षण देणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी भारत पूर्णपणे सक्षम
आहे आणि आम्ही ते करूनही दाखवले, असेही मोदी पुढे म्हणाले.

71077044 - PM Modi Mathura: ''ॐ' आणि 'गाय' शब्द ऐकताच काहींना करंट
लागतो' 
In Uttar Pradesh Under The Pretext Of Cow And Om 
Times

मथुरा: मोदींनी केलं पशु कल्याण योजनेचं उद्घाटन

42715392 - PM Modi Mathura: ''ॐ' आणि 'गाय' शब्द ऐकताच काहींना करंट
लागतो' 
In Uttar Pradesh Under The Pretext Of Cow And Om 
Times


‘२ ऑक्टोबरपर्यंत आपली घरे
प्लास्टिकमुक्त करा’

या वर्षी २ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येकाने आपली घरे. आपली कार्यालये,
आपली कार्यक्षेत्रे सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याचा प्रयत्न
करावा असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. आज स्वच्छता
ही सेवा अभियान सुरू झाले असून राष्ट्रीय प्राणी रोग प्रतिबंधक
कार्यक्रमदेखील सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले. महात्मा गांधी
यांचे हे १५०वे प्रेरणावर्ष आहे. स्वच्छता ही सेवा या मागे हीच
भावना आहे. आज पासून सुरू होत असलेले हे अभियान विशेषत: प्लास्टिक
कचऱ्यापासून मुक्तीला समर्पित करण्यात आल्याचे पंतप्रधान
म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *