photo 71080948 - sri lanka boycott pak: पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय
खेळाडूंचाच; श्रीलंकेचे स्पष्टीकरण 
boycott of pakistan: sri lanka

sri lanka boycott pak: पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय खेळाडूंचाच; श्रीलंकेचे स्पष्टीकरण boycott of pakistan: sri lanka

मराठी बातम्या


कोलंबो:
भारताच्या धमकीमुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानत येण्यास नकार
दिला हा पाकिस्तानचा आरोप श्रीलंकेने फेटाळून लावला आहे.
पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय श्रीलंकेच्या खेळाडूंनी कोणत्याही
दबावामुळे घेतला नसल्याचे श्रीलंकेचे क्रीडा मंत्री हरिन फर्नांडो
यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान सरकारचे मंत्री फवाद हुसैन चौधरी
यांनी ट्विटरद्वारे असा आरोप केला होता की भारताच्या धमकीमुळे या
खेळाडूंनी पाकिस्तानात येण्यास नकार दिला.

भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंचा आयपीएल करार रद्द करण्याची धमकी
दिल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानात येण्यास नकार
दिल्याचे वक्तव्य फवाद हुसैन चौधरी यांनी केले होते. त्यावर
श्रीलंकेने हे स्पष्टीकरण दिले आहे. फर्नांडो म्हणाले की २००९
मध्ये श्रीलंकेच्या संघाच्या बसवर पाकिस्तानात दहशतवादी हल्ला
झाला होता. यात ८ जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेच्या
पार्श्वभूमीवर १० खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय
घेतला आहे.

ते पुढे म्हणाले, ‘भारताने कोणत्याही प्रकारे श्रीलंकेच्या
खेळाडूंवर पाकिस्तानात न जाण्याबाबत कोणताही दबाव आणलेला नाही.
२००९ च्या घटनेमुळे काही खेळाडूंनी पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय
घेतला. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर राखला आणि ज्या खेळाडूंची
पाक दौऱ्यावर येण्याची तयारी होती त्यांची निवड केली.’

No truth to reports that India influenced Sri Lankan
players not to play in Pakistan.Some decided not to
play purel… https://t.co/FiD4fCEkoK

— Harin Fernando (@fernandoharin)
1568135528000

या हल्ल्यानंतर श्रीलंका संघ आजतागायत कधीही पाकिस्तानात जाऊन
खेळलेला नाही. श्रीलंकेच्या क्रिकेट संघाच्या १० खेळाडूंनी आपले
नाव पाकिस्तान दौऱ्यातून रद्द केले आहे. श्रीलंकेला
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानात मर्यादित षटकांची मालिका
खेळायची आहे. ज्या श्रीलंकेचया खेळाडूंनी दौऱ्यातून आपले नाव रद्द
करवून घेतले, त्या खेळाडूंमध्ये दिमुथ करुणारत्ने, टी-२० कर्णधार
लसिथ मलिंगा, माजी कर्णधार एंजेलो मॅथ्युज, निरोशन डिक्वेला, कुसल
परेरा, धनंजय डीसिल्व्हा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल
यांचा समावेश आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *