photo 71078034 - state youth congress support urmila matondkar: युवक काँग्रेस
उर्मिला मातोंडकर यांच्या पाठिशी 
urmila matondkar says satyajeet tambe

state youth congress support urmila matondkar: युवक काँग्रेस उर्मिला मातोंडकर यांच्या पाठिशी urmila matondkar says satyajeet tambe

मराठी बातम्या


मुंबई: पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत
काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या
उर्मिला मातोंडकर यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसने पाठिंबा
दर्शवला आहे. उर्मिला यांना पक्षात मिळालेली वागणूक निषेधार्ह आहे,
अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष
सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे. युवक काँग्रेस उर्मिला
मातोंडकर यांच्या पाठिशी असल्याचेही तांबे यांनी जाहीर केले
आहे.

उर्मिला मातोंडकर यांच्याशी आपला फारसा परिचय नाही. असे असले तरी
त्या आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ आहेत, याची आपल्याला कल्पना आहे.
म्हणूनच त्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नाहीत, असे सत्यजीत तांबे
यांनी म्हटले आहे. आपले मत व्यक्त करताना तांबे यांनी, उर्मिला
यांना पक्षात मिळालेली वागणूक निषेध करण्याजोगी असल्याचे म्हटले
आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसचे तत्कालीन
मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना तक्रार करणारे पत्र लिहिले
होते. या पत्रात निवडणुकीदरम्यान काम न करणाऱ्या
कार्यकर्त्यांविरोधात त्यांनी तक्रार केली होती. मात्र या
कार्यकर्त्यांवर देवरा यांनी कोणतीही कारवाई कर केली नाहीच, उलट
त्यांना पदे देण्यात आली, असे सांगत उर्मिला मातोंडकर यांनी
पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

आपल्याला पक्षांतर्गत राजकारणात कोणताही रस नसल्याचेही मातोंडकर
म्हणाल्या होत्या. मी दिलेले पत्र गोपनीय ठेवणे अपेक्षित असताना
ते प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आले. त्यानंतर आपण अनेकदा
नाराजीही व्यक्त केली मात्र, माझी कुणीही दखल घेतली नाही, अशी
मातोंडकर यांची तक्रार आहे. पक्षांतर्गत राजकारणासाठी माझा वापर
होऊ नये यासाठीचत आपण राजीनामा दिल्याचे त्या म्हणाल्या.

उर्मिला मातोंडकर यांनी भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या
विरोधात मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर
निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *