photo 71086538 - towing police motorbike: पोलिसांच्या वाहनांवरच वाहतूक
पोलिसांची कारवाई 
motorbike in pune

towing police motorbike: पोलिसांच्या वाहनांवरच वाहतूक पोलिसांची कारवाई motorbike in pune

मराठी बातम्या


पुणे: बेशिस्तपणे नो-पार्किंगमध्ये वाहने
लावणाऱ्या नागरिकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र,
वाहतूक पोलिसांनी आज पुणे पोलिस
आयुक्तालयात बेशिस्तपणे रस्त्यावर लावलेल्या पोलिसांच्या दुचाकींवर
कारवाई केली. क्रेनने या दुचाकी उचलून नेल्या. या दुचाकीचालकांच्या
मालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचं
कौतुक होत आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयात नेहमीच बेशिस्तपणे वाहने लावण्यात येतात.
त्यामुळे दुचाकी व चारचाकी बाहेर काढताना अडचण येते. नुकतेच पोलिस
आयुक्तालयात सुशोभीकरण करण्यात आले आहे. मुख्य प्रवेशद्वारावरून आत
आल्यानंतर डांबरी रस्ता, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी गवत, फूटपाथला
सिमेंटचे गट्टू टाकले गेले आहेत. समोरच एक मोठी भिंत तयार करून
त्यावर पुणे पोलिस असे लिहिण्यात आले आहे. कँटिनजवळ दुचाकी पार्क
करण्यासाठी पुरेशी जागा देण्यात आली आहे. असे असतानाही
आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर पोलिस कर्मचारी दुचाकी
लावत होते. बुधवारी पोलिस आयुक्तांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर
त्यांनी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या
दुचाकींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रस्त्यावर उभ्या
केलेल्या दुचाकी क्रेन लावून उचलून नेण्यात आल्या. या
दुचाकीचालकांकडून दंड वसुल करण्यात आला. पोलिस आयुक्तालयात वाहतूक
शाखेकडून कारवाई सुरू झाल्यामुळे काही वेळ गडबड उडाली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *