photo 71188365 - hindi language: हिंदी लादण्याबाबत बोललोच नव्हतो; शहा यांचा
खुलासा

hindi language: हिंदी लादण्याबाबत बोललोच नव्हतो; शहा यांचा खुलासा

मराठी बातम्या


नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांनी ‘एक देश, एक भाषे’चा आग्रह धरल्यानंतर त्यावर
सर्वस्तरातून विरोध झाल्याने अखेर शहा यांनी सारवासारव केली आहे. मी
कोणत्याही प्रादेशिक भाषांवर
हिंदी भाषा लादण्याची भूमिका मांडली नव्हती. मी केवळ
मातृभाषेनंतर दुसरी भाषा म्हणून हिंदी शिकायला हवी, असं म्हटलं
होतं, असा खुलासा करतानाच मी काही हिंदी भाषिक राज्यात राहत नाही.
मी गुजरातचा आहे. मात्र जर काही लोकांना या विषयावर राजकारणच करायचं
असेल तर त्यांना त्याचा अधिकार आहे, असा टोला शहा यांनी लगावला.

हिंदी दिनानिमित्त अमित शहा यांनी हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्याचं
आवाहन केलं होतं. देशाला एकजूट ठेवण्याचं काम केवळ हिंदीच करू शकते.
भारतात अनेक भाषा आहेत आणि या भाषांचं वेगळं महत्त्व आहे. मात्र
देशात एक भाषा असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर
आपली ओळख निर्माण होऊ शकते, असं सांगतानाच ‘एक देश, एक भाषा’ या
भूमिकेचा शहा यांनी पुरस्कार केला होता. शहा यांच्या या भूमिकेनंतर
देशात एकच वादळ निर्माण झालं होतं. दक्षिण भारतातील नेते आणि
अभिनेत्यांनी शहांच्या या भूमिकेचा तीव्र विरोध केला होता.

त्यामुळे शहा यांनी सारवासारव केली आहे. मी कोणत्याही प्रादेशिक
भाषांवर हिंदी थोपविण्याचं वक्तव्य केलं नव्हतं. मातृभाषा
शिकल्यानंतर दुसरी भाषा म्हणून हिंदी शिकण्याचा आग्रह मी केला
होता, असं शहा यांनी सांगितलं. शहा यांच्या या खुलाश्यानंतर
डीएमकेने तामिळनाडूतील हिंदीविरोधी आंदोलन स्थगित केलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *