photo 71186467 - Kyle Abbott: ४० धावांत ९ बळी; अॅबॉटने केली कमाल 
africa’s kyle abbott picks 9 wickets in an innings to send records
tumbling

Kyle Abbott: ४० धावांत ९ बळी; अॅबॉटने केली कमाल africa’s kyle abbott picks 9 wickets in an innings to send records tumbling

मराठी बातम्या


साउथम्पटन: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज

काइल अॅबॉट एकाच डावात ९ गडी बाद करून प्रकाशझोतात आला आहे. हा
पराक्रम त्याने इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिपच्या ‘डिव्हिजन वन’
अंतर्गत झालेल्या प्रथमश्रेणी सामन्यात केला आहे. हॅम्पशायरकडून
खेळताना सोमरसेटच्या फलंदाजीची अॅबॉटने दाणादाण उडवली. त्याने १८.४
षटकांत ४० धावा देऊन ९ गडी बाद केले. ही त्याच्या कारकीर्दीतील
सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.

भारतीय फलंदाज मुरली विजय अॅबॉटचा पहिला शिकार ठरला. विजय खाते न
उघडताच माघारी परतला. त्यानंतर अॅबॉटने यष्टिरक्षक व फलंदाज
स्टीव्हन डेव्हिसचा अडसर दूर केला. टॉम एबेल अॅबॉटचा तिसरा बळी
ठरला. अॅबॉटच्या भेदक माऱ्यापुढे सोमरसेटच्या फलंदाजीचा टिकाव लागला
नाही. जेम्स हिलड्रेथ, जॉर्ज बार्टलेट, लेविस ग्रगोरी, क्रेग
ओव्हरटन, डॉमिनिक बेस आणि जोश डेवी या फलंदाजांने अॅबॉटने स्वस्तात
माघारी धाडले. सर्वाधिक ३७ धावा बेसने केल्या. अॅबॉटने टिच्चून मारा
केल्याने सोमरसेटचा डाव ४८.४ षटकांत १४२ धावांवर संपुष्टात आला.

दरम्यान, अॅबॉटने सोमरसेटला झटपट गुंडाळल्याने या सामन्यावर
हॅम्पशायरने चांगली पकड मिळवली आहे. दुसऱ्या दिवसअखेर
हॅम्पशायरकडे २३० धावांची आघाडी आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *