photo 71185027 - World Boxing Championships: वर्ल्ड बॉक्सिंग: अमितसह ४ खेळाडू
क्वार्टर फायनलमध्ये 
quarterfinals in world boxing championships 
Times

World Boxing Championships: वर्ल्ड बॉक्सिंग: अमितसह ४ खेळाडू क्वार्टर फायनलमध्ये quarterfinals in world boxing championships Times

मराठी बातम्या


नवी दिल्ली: रशियात सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग
चॅम्पियनशीपमध्ये भारतीय खेळाडू पदकांची लयलूट करण्याची शक्यता आहे.

अमित पानघळ, संजीत, कविंदर सिंग आणि मनिष कौशिक हे चार भारतीय
बॉक्सर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपच्या क्वार्टर फायनलमध्ये
पोहोचले आहेत. या चारही खेळाडूंनी हा सामना जिंकल्यास त्यांच्या
खात्यात किमान ब्राँझ पदक तरी जमा होणार आहे.

अमित पानघळने ५३ किलोग्रॅम वजनी गटाच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये
तुर्कीच्या बातुहान सिटफीला ५-०ने पराभूत करून क्वार्टर फायनलमध्ये
प्रवेश केला. आता अमितचा पुढचा मुकाबला फिलिपाइन्सच्या कार्लो
पालामशी होणार आहे. गेल्या वर्षी आशियाई बॉक्सिंग स्पर्धेच्या
सेमीफायनलमध्ये अमितने पालामला पराभूत केलं होतं. २०१७मध्ये अमितने
क्वार्टर फायनलपर्यंत धडक दिली होती.

दुसरीकडे ६३ किलो वजनी गटात मनिष कौशिकने मंगोलियाच्या चिनजोरिग
बातारसुखचा ५-०ने पराभव केला आहे. चिनजोरिगने आशियाई स्पर्धेत रजत
पदक जिंकलेलं आहे. त्याने आशियाई चॅम्पियनशीपमध्ये दोनदा पदकही
मिळविलं आहे. तर संजितने उज्बेकिस्तानच्या संजार तुरसुनोवचा ४-१
पराभव केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *