photo 71493256 - उमेदवारांनी साधला प्रचारसंधीचा सुवर्णयोग!

उमेदवारांनी साधला प्रचारसंधीचा सुवर्णयोग!

ठळक बातम्याphoto 71493256 - उमेदवारांनी साधला प्रचारसंधीचा सुवर्णयोग!

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानसभा निवडणुकीची अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर राजकीय पक्षांसह उमेदवारांना प्रचारासाठी विजयादशमीच्या मुहुर्ताचा योग चालून आला. उमेदवारांनी या संधीचे ‘सोने’ करीत आपल्या प्रचाराचा नारळ फोडून मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांना सोने वाटत त्याआडून आपल्याला निवडून देण्याचे आवाहनही केले.

हिंदू संस्कृतीत विजयादशमी हा साडेतीनपैकी एक मुहूर्त गणला जातो. या दिवशी शुभ कार्याची सुरुवात केली जाते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी हा शुभमुहूर्त उमेदवारांसाठी चालून आला आहे. विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यास २७ सप्टेंबरपासून सुरुवात झाली होती. ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. ७ ऑक्टोबर ही अर्ज माघारीची मुदत होती. माघारीनंतर निवडणुकीच्या रिंगणातील चित्र स्पष्ट झाले असून, दुसऱ्याच दिवशी विजयादशमीचा मुहूर्त आल्याने उमेदवारांसाठी तो सुवर्णयोग ठरला. सर्व उमेदवारांनी प्रचाराचा श्रीगणेशा करण्याची संधी साधली. सुटीचा दिवस असल्याने उमेदवारांनी सकाळपासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. ऐनवेळी पक्षबदल केलेले नाशिक पूर्व मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अॅड. राहुल ढिकले यांनी संघाच्या संचलनात सहभाग घेतल्यानंतर प्रचाराचा नारळ फोडला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप यांनीही दसऱ्याचा मुहूर्त साधत मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. नाशिक मध्य मतदारसंघातही काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील, मनसेचे नितीन भोसले, भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे यांनी प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. नाशिक पश्चिमध्येही भाजपच्या सीमा हिरेंनी सकाळच्या सत्रात मतदारांच्या भेटी घेत सायंकाळी शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला. राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे, मनसेचे दिलीप दातीर, माकपचे डॉ. डी. एल. कराड आणि शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन करीत, प्रचाराचा शुभारंभ केला. देवळाली मतदारसंघातही शिवसेनेचे योगेश घोलप आणि राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांनी प्रचाराचा नारळ फोडला.

सोने घ्या, मत द्या!

दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना सोन्याचे महत्त्व प्राप्त होते. ही पाने देऊन नातेवाईक, आप्तस्वकीय एकमेकांना शुभेच्छा देत, मनोमिलन करतात. यंदा उमेदवारांनी घरोघरी मतदारांना हे ‘सोने’ वाटत त्याबदल्यात आपल्याला मत देण्याचे आवाहन केले. मतांसाठी उमेदवारांची सोज्ज्वळ, शालीन वर्तणूक पाहून नागरिकही आश्चर्यचकीत झाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *