photo 71510432 - बुमराह
- jasprit bumrah and his mother recall days of struggle |
Maharashtra Times

बुमराह – jasprit bumrah and his mother recall days of struggle | Maharashtra Times

मराठी बातम्या


मुंबई:
जसप्रीत बुमराह हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चमकता तारा
आहे. आयसीसी क्रमवारीत त्याने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. आपल्या
भेदक गोलंदाजीने त्याने यशोशिखर गाठले असले तरी त्याचा येथपर्यंतचा
प्रवास प्रचंड संघर्षाचा राहिला आहे. आज त्याला सर्वकाही क्रिकेटने
दिलं असलं तरी लहानपणीच पितृछत्र हरपलेल्या जसप्रीतसाठी कधीकाळी एक
जोड स्पोर्ट्स शूज आणि टी-शर्टसाठी मोठा संघर्ष करावा लागायचा…
जसप्रीत आणि त्याच्या आईनेच ही संघर्षकथा सांगितली आहे.

आयपीएलने सर्वात आधी जसप्रीत बुमराहला हिरो केले. जगभरातील दिग्गज
खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून बुमराहला
संधी मिळाली आणि बघता बघता तो स्टार क्रिकेटपटू बनला. हटके गोलंदाजी
शैली आणि भेदक व वेगवान मारा यामुळे त्याने भल्याभल्या फलंदाजांना
जेरीस आणलं. आज बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आघाडीचा
गोलंदाज म्हणून आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं असतानाच
‘मुंबई इंडियन्स’ने बुमराहच्या संघर्षगाथेचा हृदयस्पर्शी आणि तितकाच
प्रेरणादायी असा प्रवास सर्वांपुढे आणला आहे. मुंबई इंडियन्सच्या
अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून त्यात
बुमराह आणि त्याची आई दलजीत यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे.

जसप्रीत पाच वर्षांचा होता तेव्हा त्याच्या बाबांचे निधन झाले,
असे दलजीत सांगतात… त्यावर जसप्रीत व्यक्त होतो. ‘बाबा
गेल्यानंतर आमचा आधारवडच गेला. घरात कमावणारा अन्य कुणीच नव्हता.
तेव्हा नवे शूज घेण्याइतकेही पैसे नसायचे. माझ्याकडे केवळ एक जोड
शूज आणि एक टी-शर्ट होते. हेच टी-शर्ट रात्री धुवून दुसऱ्या दिवशी
पुन्हा घालायचो… पुढे क्रिकेटच्या मैदानात चमक दाखवत गेलो. मग
सतत वाटायचं कुणीतरी माझी गोलंदाजी पाहील आणि माझी निवड
होईल…आणि झालंही तसंच. मुंबई इंडियन्ससाठी जॉन राइट यांनी माझी
निवड केली. सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत खेळताना मला राइट
यांनी पाहिलं होतं. २०१३ मध्ये आयपीएलमध्ये मला मुंबई
इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली…जसप्रीत नम्रपणे सांगत
होता.

“Talent can come from anywhere and reach the pinnacle
of success.” Watch the transformational journey of…
https://t.co/5clD72kSON

— Mumbai Indians (@mipaltan)
1570599151000

दलजीत यांनीही आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. ‘जेव्हा मी
पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळताना जसप्रीतला टीव्हीवर पाहिलं तेव्हा
माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तो क्षण माझ्यासाठी स्वप्नवत होता.
जसप्रीतने मला संघर्ष करताना पाहिलं आहे. त्याला सगळं ठाऊक आहे’,
असे दलजीत म्हणाल्या.

दरम्यान, २५ वर्षीय जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर
आहे. त्याच्या लोअर बॅकमध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर आहे. त्यावर तो
लंडनमध्ये उपचार घेत आहे. या उपचारांनंतर येत्या डिसेंबर महिन्यात
बुमराह भारतीय संघात परतेल, अशी आशा आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *