photo 71507808 - 'या' चित्रपटाचा धुमाकूळ, 'बाहुबली'शी तुलना

'या' चित्रपटाचा धुमाकूळ, 'बाहुबली'शी तुलना

मराठी बातम्याphoto 71507808 - 'या' चित्रपटाचा धुमाकूळ, 'बाहुबली'शी तुलना

मुंबईः अभिनेता चिरंजीवीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ रेड्डी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई सुरूच आहे. आठवडाभरातच ‘साय रा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला असून या चित्रपटाची आता थेट ‘बाहुबली’ या गाजलेल्या चित्रपटाशी तुलना केली जात आहे.

‘साय रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटाचे सुरेंद्र रेड्डी हे दिग्दर्शक असून या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आठवडा उलटला आहे. तहीरी या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. महागडा समजला जाणारा आणि जवळपास २०० कोटी खर्च आलेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १०० कोटींचा आकडा गाठला आहे. ट्रेंड पंडितांच्या म्हणण्यानुसार, बाहुबली या चित्रपटानंतर ‘साय रा नरसिम्हा रेड्डी’ हा पहिलाच चित्रपट आहे जो कमी वेळात त्याने शंभर कोटींचा गल्ला जमवला आहे. हैदराबादमधील आरटीसी एक्स रोडवर असलेल्या चित्रपटगृहात या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात चांगली कमाई केली असून ती अद्याप सुरू आहे. इतर चित्रपटांशी तुलना केल्यास ‘साय रा नरसिम्हा रेड्डी’ची कमाई महेश बाबू यांच्या ‘महर्षि’आणि राम चरण यांच्या ‘रंगस्थलम’ या चित्रपटापेक्षा कमी आहे. आंध्र प्रदेशमधील ओंगलमध्ये चित्रपटाने एक कोटींचा गल्ला जमवला आहे. या ठिकाणी हा चित्रपट पाच चित्रपटगृहात सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी पहिल्या आठवड्यातील शेवटच्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

‘साय रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटात अभिनेता चिंरजीवसोबत अमिताभ बच्चन आहे. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात चिंरजीवीच्या गुरूची भूमिका साकारली आहे. अमिताभ यांचा ऋषी मुनी असलेला लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. तसेच या चित्रपटात किच्चा सुदीप आणि नयनतारा व विजय सेतुपति यांच्या सुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *