photo 71505328 - 'रोहितला सलामीला खेळण्याचा आनंद घेऊ द्या'
 virat kohli asks journalists to "stop
focusing on what rohit sharma is going to do in tests" |
Maharashtra Times

‘रोहितला सलामीला खेळण्याचा आनंद घेऊ द्या’ virat kohli asks journalists to “stop focusing on what rohit sharma is going to do in tests” | Maharashtra Times

मराठी बातम्या


पुणे : ‘आता रोहितचा विषय फारच झाला. तो चांगली
कामगिरी करतो आहे. सलामीला खेळण्याचा आनंद त्याला घेऊ द्यायला हवा.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो ज्या पद्धतीने आनंद घेऊन खेळतो,
तसेच त्याला कसोटीतही खेळू द्या. रोहित काय करतो आहे, याकडे कृपया
लक्ष देणे बंद करा. तो चांगल्या फॉर्मात आहे’, असे मत भारतीय
क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी
मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून पुण्यात रंगणार आहे. या कसोटीच्या
आधी आज झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितबाबत विचारले असता त्यावर
कोहलीने आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले व रोहितचे भरभरून कौतुक
केले.

पहिल्या कसोटीत रोहित शर्माला सलामीला बढती देण्यात आली. या
संधीचा रोहितने पुरेपूर फायदा उचलला व सर्व टीकाकारांची तोंडे बंद
केली. रोहितने दोन्ही डावांत खणखणीत शतकं ठोकली. त्या जोरावर
भारताने विजयाला गवसणी घातली. अर्थात रोहितच या सामन्याचा
सामनावीर ठरला. त्या अनुशंगाने बोलताना विराट म्हणाला,
‘विशाखापट्टणम् कसोटीत रोहितवर कोणतंही दडपण दिसलं नाही. त्याने
त्याचा नैसर्गिक खेळ केला. ही आमच्यासाठी सर्वात चांगली बाब आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये रोहितने जो काही अनुभव मिळवला आहे, तो
त्याच्या खेळातून दिसत आहे. रोहितची दुसऱ्या डावातील खेळी तुम्ही
पाहिली असेलच. त्याने ज्याप्रकारे धावांचा वेग वाढवला ते
वाखाणण्याजोगा होता. त्या जोरावर झटपट अपेक्षित धावांचे लक्ष
आम्ही उभे करू शकलो व पाहुण्या संघाविरुद्ध डावपेच आखण्यासाठी दीड
ते दोन तासांचा अतिरिक्त वेळ आम्हाला मिळाला, असे विराट म्हणाला.

“Time to let Rohit Sharma enjoy his batting in red ball
cricket” – @imVkohli #TeamIndia #INDvSA
https://t.co/px6Nhl1sy0

— BCCI (@BCCI) 1570604700000

विदेशात जिंकल्यास दुप्पट गुण मिळावेत

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विदेशात सामना जिंकल्यास त्या
संघाला दुप्पट गुण दिले गेले पाहिजेत, असा सल्ला यावेळी विराटने
दिला. मला कुणी गुणतक्ता बनवायला सांगितला असता तर मी निश्चितच
अशा संघाला दुप्पट गुण दिले असते, असेही तो पुढे म्हणाला. टेस्ट
चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यामध्ये भारत १६० गुणांसह सध्या पहिल्या
स्थानावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची मालिका
जिंकल्यानंतर भारताच्या खात्यात १२० गुणांची भर पडली होती. तर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारताला ४० गुण
मिळाले आहेत.

दरम्यान, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिली कसोटी
जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना
उद्यापासून पुण्यात होत आहे तर तिसरा कसोटी सामना १९ ऑक्टोबरपासून
रांचीमध्ये रंगणार आहे.

खेळपट्टीची मागणी? छे,
ते काय असते…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *