photo 71493473 - ‘सुवर्ण’योग साधला

‘सुवर्ण’योग साधला

ठळक बातम्याphoto 71493473 - ‘सुवर्ण’योग साधला

खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साडे तीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या दसरा सणाच्या निमित्ताने सोने खरेदी करण्याचा योग नाशिककरांनी साधला. सोन्याचे वेढे, दागिने खरेदी करण्यासाठी दुकाने उघडल्यापासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांनी गर्दी केली होती. दर वाढले असले तरी सोने खरेदीचा उत्साह कायम होता. या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे सराफ व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

हिंदू संस्कृतीत दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. यानिमित्त सराफ व्यावसायिकांनी दुकाने सजवून व विविध ऑफर्स देत ग्राहकांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला. ठराविक रकमेच्या खरेदीवर घडणावळीत सूट, तसेच लकी ड्रॉ काढण्यात आले. ग्राहकांनीही ऑफर्सचा पुरेपूर लाभ घेत सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये गर्दी केली होती. यामध्ये चेन, अंगठी, हार, नेकलेस, पेंडंट, पाटल्या, बांगड्यांची ग्राहकांनी खरेदी केलीच शिवाय चोख सोन्याच्या वस्तूंनाही प्राधान्य दिले. एक ग्रॅमपासून पन्नास ग्रॅमपर्यंतची बिस्किटे, वेढणी खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली. चोख सोन्याला असलेल्या मागणीमुळे अनेक सराफ व्यावयासिकांनी वेढणी विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था, वेगळे काऊंटर उपलब्ध करून दिले होते.

दर वाढले, मात्र मागणी कायम

दसऱ्याला २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमसाठी भाव ३८ हजार ६०० इतका होता, तर २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमसाठी ३५ हजार ३०० भाव होता. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे भाव वाढले आहेत. मात्र, याचा सोने खरेदीवर परिणाम झाला नसल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला महत्त्व आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात कितीही चढ-उतार झाली तरी अशा मुहूर्तावर सोने खरेदी करण्यास गर्दी असते. यंदाही या मुहूर्तावर मोठी उलाढाल झाली.

– गिरीधर आडगावकर, सराफ व्यावसायिकSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *