photo 71509600 - business news News: बोर्डरूम किचन; 'टाइम्स फूड'ची पहिली वेब
सीरिज 
cooking strategies at times food’s boardroom kitchen 
Times

business news News: बोर्डरूम किचन; ‘टाइम्स फूड’ची पहिली वेब सीरिज cooking strategies at times food’s boardroom kitchen Times

मराठी बातम्या


नवी दिल्लीः कंपनीचे सर्व निर्णय केवळ बोर्डरूम,
सूट-क्लॅडमध्ये बसून नाही, तर आता शेफ हॅट घालून, भाज्या चिरत आणि
खमंग पदार्थ बनवताना सीईओ घेताना दिसतील. हे चित्र ‘टाइम्स फूड’च्या
‘बोर्डरूम
किचन’ या पहिल्या वहिल्या रिअॅलिटी वेब सीरिजमधून पाहायला
मिळणार आहे. नावाजलेल्या कंपन्यांचे सीईओ या वेब सीरिजमधून
प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यांचे आवडते पदार्थ, आवडती
खायची ठिकाणं ते शेअर करणार आहेत. एवढेच नव्हे, तर काही खुसखुशीत
पदार्थही ते या कार्यक्रमात करून दाखवणार आहेत. शेफ आदित्य बाळ
यांच्यासोबत या सीईओंची गप्पांची मैफलही रंगणार आहे.

ही विकली वेब सीरिज असेल. timesfood.com या
संकेतस्थळावर दर आठवड्याला या वेब सीरिजचा नवा भाग प्रदर्शित होईल.
पहिल्या सीझनमध्ये सहा भाग असणार आहेत. यामधील पहिल्या भागात
स्पेन्सर रीटेलचे सीईओ देवेंद्र चावला, ड्रूम टेक्नॉलॉजीचे संस्थापक
व सीईओ संदीप अग्रवाल, केंट आरओचे संचालक वरुण गुप्ता, मोदी केअरचे
संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक समीर मोदी आणि दिल्ली कॅपिटल्सचे
सीईओ धीरज मल्होत्रा सहभागी होणार आहेत. आपापल्या क्षेत्रात
अग्रगण्य असलेल्या कंपन्यांचे हे सीईओ व्यवसायासह खाद्य पदार्थ आणि
स्वयंपाक घरातील अनुभव सांगणार आहेत.

उत्तम संवादासाठी अन्न ही एक परिपूर्ण रेसिपी आहे. जेवण बनवता
बनवता भारतीय उद्योजकांच्या मनात डोकावण्याचा हा एक चांगला मार्ग
आहे. ‘टाइम्सफूड’ची पहिली वेब सीरिज सादर करताना आम्ही उत्साहित
आहोत. या वेब सीरिजच्या माध्यमातून उद्योजकजतेसह खवय्येपणा
जपणाऱ्या सीईओंना देशभरातील प्रेक्षक पाहू शकतील, असे टाइम्स
इंटरनेटचे सीओओ पुनीत गुप्त यांनी सांगितले.

शेफ आदित्य यांच्यासोबत गप्पा मारताना, जेवण बनवाताना खूपच मजा
आली. एक उद्योजक म्हणून स्वयंपाक करणे आणि व्यवसायाचे नेतृत्व
करणे यात बरेच साम्य आहे. चांगली गोष्ट घडवताना दोन्ही ठिकाणी
व्यंजनांच्या मिश्रणाचा योग्य समतोल राखणे आवश्यक असते, असे नमूद
करताना प्रेक्षकांना हा कार्यक्रम नक्कीच आवडेल, असा विश्वास
ड्रुम टेक्नॉलॉजीचे संस्थापक व सीईओ संदीप अग्रवाल यांनी व्यक्त
केला.

‘बोर्डरूम किचन’मधून तुम्हाला यथेच्छ पोटपूजा घडवणाऱ्या
पाककृतींचा खजाना तर मिळेलच, शिवाय तुम्हाला उपयुक्त असं वैचारिक
खाद्यही यात मिळेल. या उद्योजकांची पूर्वी कधीही न पाहिलेली बाजू
शोधण्याची ही एक अनोखी संधी आहे, जी सर्वसाधारणपणे सामान्य
प्रेक्षकांना उपलब्ध होत नाही. त्यामुळेच timesfood.com सोबत
राहा आणि ‘बोर्डरूम किचन’चा हा पहिला सीझन पाहण्याचा ‘मौका’ साधा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *