photo 71508829 - sedition cases: 'त्या' ५० जणांविरोधातील देशद्रोहाचा गुन्हा
मागे 
50 celebrities who wrote letter to pm modi 
Times

sedition cases: ‘त्या’ ५० जणांविरोधातील देशद्रोहाचा गुन्हा मागे 50 celebrities who wrote letter to pm modi Times

मराठी बातम्या


मुझफ्फरपूरः देशातील मॉब लिंचिंग घटनेविरोधात आवाज
उठवणाऱ्या तसेच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणाऱ्या बॉलिवूडसह अन्य
इंडस्ट्रीजमधील जवळपास ५० जणांविरोधात दाखल करण्यात आलेला
देशद्रोहाचा गुन्हा अखेर मागे घेण्यात आला आहे. मुझफ्फरपूरच्या
पोलीस अधीक्षकांनी या सर्वांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे
घेण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
पाठवल्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने सर्वच
स्तरांतून टीका केली होत असल्याने हा गुन्हा मागे घेण्यात आला
आहे.

मुझफ्फरमधील स्थानिक वकील सुधीर कुमार झा यांनी दोन महिन्यापूर्वी
एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायदंडाधिकारी
सूर्यकांत तिवारी यांनी निर्देश दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात
आला होता. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये इतिहासकार रामचंद्र
गुहा, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्श मणि रत्नम, दिग्दर्शक अनुराग कश्यप,
बंगाली चित्रपटसृष्टीतील विख्यात दिग्दर्शक व अभिनेत्री अपर्णा सेन
यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांना जुलै महिन्यात खुले पत्र लिहिले होते. मोदींना पत्र पाठवून
मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा बनवणे आणि या
प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी कायद्यात तरतूद
करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या पत्रात लिहिले होते की, आपले
संविधान हे भारताला धर्मनिरपेक्ष गणराज्य असल्याचे सांगते. या
ठिकाणी प्रत्येक धर्म, समाज, लिंग, जाती आदिंना एकसमान अधिकार आहे.
दलित, मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्याक समाजाविरोधात होणारी लिंचिंग
रोखणे आवश्यक आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी या घटना घडल्यानंतर केवळ टीका करून चालणार नाही
तर कायद्यात बदल करावा व आरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी कडक
पावलं उचलावीत असे या पत्रातून मागणी करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणाऱ्या व त्यावर स्वाक्षरी
करणाऱ्या ५० जणांविरोधात मी याचिका दाखल केली होती. देशाचे नाव
बदनाम करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगले काम
करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप
याचिकेतून करण्यात आला होता. कोर्टाच्या निर्णयानंतर पोलिसांनी
एफआयआर दाखल करून घेतला आहे. या गुन्ह्यात
देशद्रोह, सार्वजनिक ठिकाणी चुकीची माहिती पसरवणे, धार्मिक
भावना दुखावणे, तसेच शांतता भंग करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न
करणे, याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही सुधीर ओझा
यांनी म्हटले होते.

मोदींना पत्र
पाठवणाऱ्या ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखलSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *