photo 71513210 - fire incidents: मुंबईत रात्री तीन ठिकाणी आग, जीवितहानी नाही
- mumbai: 3 fire incidents in night

fire incidents: मुंबईत रात्री तीन ठिकाणी आग, जीवितहानी नाही – mumbai: 3 fire incidents in night

मराठी बातम्या


मुंबई: मुंबईत बुधवारी रात्री तीन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. या
आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सहाजण जखमी झाले असून
त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बुधवारी रात्री सांताक्रुझ येथील मिलन सब-वे येथील एका गोदामाला
भीषण आग लागली. या आगीत तीन गोदामे जळून खाक झाली आहेत. मात्र आगीत
कोणतीही जीवितहानी झाली नाही. १० गाड्यांच्या सहाय्याने ही आग
अवघ्या दहा मिनिटातच नियंत्रणात आणण्यात आली. वडाळ्यातही गणेशनगर
झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीत सहाजण जखमी झाले आहेत. जखमींना
रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आग्रीपाडा येथे एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागली.
एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. अग्निशमन दलाच्या
दहा गाड्यांच्या सहाय्याने ही आग नियंत्रणात आणण्यात आली.
दरम्यान, या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *