photo 71513032 - Health News: रजोनिवृत्ती काळ: स्त्रियांमधील शारीरिक व मानसिक
बदल 
Maharashtra Times

Health News: रजोनिवृत्ती काळ: स्त्रियांमधील शारीरिक व मानसिक बदल Maharashtra Times

मराठी बातम्या


डॉ. सपना चौधरी, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ

रजोनिवृत्ती (मेनोपॉज) म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद
होणे. सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ ते ५० व्या वर्षी स्त्रीला मेनोपॉज
येऊ शकतो. पाळी बंद होण्याआधी काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या
शरीरात त्या दृष्टीने काही बदल घडायला सुरुवात होते. या काळाला
‘पेरीमेनोपॉजल पिरीयड’ म्हणतात. हा काळ साधारणपणे तीन ते चार
वर्षांचा असू शकतो. मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा आजार नाही.
निसर्गचक्राचाच हा एक भाग आहे. त्यामुळे जीवनाच्या या पर्वाला
सकारात्मक भावनेने स्वीकारणे आवश्यक आहे.

मेनोपॉजची लक्षणे

– मासिक पाळीच्या चक्रात बदल होणे. हा बदल विविध स्त्रियांमध्ये
विविध प्रकारे दिसून येतो.

– पाळी महिन्याच्या महिन्याला येते. मात्र रक्तस्त्राव कमी होतो
किंवा खूप रक्तस्त्राव होत राहतो आणि काही महिन्यांनी पाळी यायची
थांबते.

जननेंद्रियावरील परिणाम

– गर्भाशयाच्या तोंडाचा आकार लहान होऊन ते आत सरकते.

– योनीमार्गाचा आकार लहान होतो.

– गर्भाशयाला आधार देणारे स्नायू अशक्त होऊन ते सैल होतात व
गर्भपिशवी खाली उतरते.

– गर्भपिशवी आकाराने कमी होते.

– अंडाशय लहान होते. त्यामुळे त्यातून स्त्रवणारी, स्त्रीत्व
देणारी इस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रॅान नामक हार्मोन्स कमी होतात.
त्याचे परिणाम स्त्रीच्या संपूर्ण शरीरावर दिसू लागतात.

– गर्भपिशवी खाली आल्याने मूत्रमार्गावरील नियंत्रण कमी होते.
त्यामुळे जोरात खोकल्यावर वा शिंक आल्यावर आपोआप लघवी बाहेर पडते.

– लघवीवर ताबा राहत नाही. त्यामुळे पहिल्यापेक्षा वरचेवर लघवीला
जावे लागते.

– लघवीला जळजळ होऊ लागते. (कारण इस्ट्रोजन हार्मोन्सची कमतरता) या
गोष्टींची लाज वाटून आत्मविश्वास डळमळतो. अनेकदा लोकसंपर्क टाळून
एकटे राहण्याकडे अशा महिलांचा कल असतो.

अन्य परिणाम –

ऑस्ट्रीयो पोरेसी: जसे-जसे वय वाढते तसे-तसे हाडांतील कॅल्शिअमचे
प्रमाण घटत जाते. रजोनिवृत्तीमध्ये स्त्रीला देणारी हार्मोन्सची
पातळी रक्तातील व हाडांतील कॅल्शिअमचे प्रमाण संतुलित ठेवते.
त्यामुळे हाडांतील कॅल्शिअम वेगाने निघून जायाला लागते व हाड
ठिसूळ व्हायला लागतात. याला ऑस्ट्रीयो पोरेसी म्हणतात. यामुळे
जरासे पडण्याने मांडीची, हातांची हाडे फ्रॅक्चर होऊ शकतात.

संधिवात वा सांधेदुखी: गुडघ्यामध्ये, घोट्यांमध्ये टाचांमध्ये
दुखणी सुरू होतात. या सर्व गोष्टी हाडांची झीज होऊ लागते.
कंबरदुखी, पाठदुखी लागते. मानेच्या स्पॉन्डेलायटीसची सुरुवात
होते. त्यामुळे चक्कर येणे, मान दुखणे, हाताला मुंग्या येणे
इत्यादी त्रास सुरू होतात.

मानसिक आरोग्य:

– औदासिन्य, चिडचिडेपणा, सहनशीलता कमी होणे.

– अंग एकदम गरम वाटायला लागते.

– घाम सुटणे, अंग एकदम थंड पडणे, गरम थंड हवा सहन न होणे,
डोकेदुखी जाणवत राहणे, छातीत धडधड, झोप न लागणे, असे बदल स्वभावात
होऊ लागतात. पाळी न आल्यामुळे गरोदर राहण्याची सुप्त भीतीही मनात
राहते.

हार्मोन्सचे असंतुलन: रजोनिवृत्तीमध्ये हार्मोन्स कमी होतात.
त्यामुळे चेहऱ्यावर लव येणं, त्वचेची कांती कमी होणे, तिला
सुरकुत्या पडणे, केस पातळ होणे, वजन वाढणे या गोष्टी होतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *